Maharashtrachi Hasyajatra:    'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या  छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाला  प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या शोमधील अभिनेता प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar) हा त्याच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकतो. गुरुवारी (1 जून) प्रसादच्या आईचा वाढदिवस होता. आईच्या वाढदिवसानिमित्त प्रसादनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टला त्यानं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले. 


प्रसाद खांडेकरची खास पोस्ट


प्रसादनं त्याच्या आईसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोमध्ये प्रसादची आई केक कट करताना दिसत आहे. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं,   'Happy wala birthday आई, वाढदिवसाची नक्की डेट माहीत नसणाऱ्या करोडो लोकांचा घोषित वाढदिवस 1 जून ला साजरा होतो तसाच तुझा ही साजरा होतोय आई ....नक्की वय तुला ही सांगता येणार नाही ....आणि नकोच मोजूस ...कारण मला अजून ही तू तशीच तरुण वाटतेस ....जशी मला माझ्या लहानपणी वाटायचीस ...अजून ही रात्री शूट वरून प्रयोगावरून किती ही लेट होउदे ...वाट बघत जागीच असतेस .....कधी कधी वैतागतो मी की का एवढ्या रात्री लेट पर्यंत वाट बघत जागी राहतेस ...पण कधी चुकून तुझा फोन नाही आला तर मलाच चुकल्यासारख वाटत ...आणि मग मीच फोन करून विचारतो फोन का नाही केलास आई ...... बाबू जरा वजन कमी कर म्हणत दोन पोळ्या जास्तीच्या तूच वाढतेस ....भाताने शुगर वाढते बोलतेस पण मला आवडतो म्हणून थोडा तरी डाळभात बळेच खाऊ घालतेस ..


पुढे प्रसादनं पोस्टमध्ये लिहिलं, 'सगळ्यांनाच आईचे कष्ट माहीत असतात तसे मला ही माहीत आहेत पण श्लोक ज्या वेळी अल्पा च्या पोटात होता त्यावेळी तू माझ्यासाठी सोसलेल्या कष्टाची पुन्हा नव्याने जाणीव झाली. आई happy wala birthday तुला खुप खुप खुप शुभेच्छा आणि खुप खुप खुप पप्प्या'






'महाराष्ट्राची हास्यजत्रा'  (Maharashtrachi Hasyajatra)  या कार्यक्रमातील प्रसाद खांडेकरसोबतच समीर चौघुले , विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, दत्तू मोरे, गौरव मोरे  आणि वनिता खरात या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातील अभिनेत्यानं घेतली नवी कार; फोटो शेअर करत म्हणाला, 'सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसाला...'