Bigg Boss Marathi Season 5 : सोशल मीडियावर गुलीगत म्हणून प्रसिद्ध झालेल्या सूरज चव्हाणसाठी (Suraj Chavan) सध्या सोशल मीडियावर बराच सपोर्ट तयार झाला असल्याचं पाहायला मिळतंय. बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात सूरजला मिळत असणारी वागणूक ही अनेकांना आवडत नसल्याचंही चित्र सध्या सोशल मीडियावर आहे. जितकं त्याला त्याच्या फॉलोअर्सचा सपोर्ट मिळत असल्याचं पाहायला मिळतंय, तितकंच आता सिनेसृष्टीतूनही सूरजसाठी अनेकजण सपोर्ट करत असल्याचंही चित्र सध्या आहेत.
चला हवा येऊ द्या फेम अभिनेता अंकुर वाढवे याने सूरजसाठी केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये घरात सूरजला मिळत असलेल्या वागणुकीवरही त्याने स्पष्ट भाष्य केलं आहे. यावर अनेकांनी कमेंट्स करत अंकुरच्या मताचं समर्थनही केलं आहे. बिग बॉसच्या घरात असलेल्या सोशल मिडिया स्टार्सना सध्या बराच सपोर्ट मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.
अंकुरची पोस्ट नेमकी काय?
अंकुरने त्याच्या फेसबुकवर पोस्ट लिहत म्हटलं की, दोन्ही वेळची भांडी, साफसाफाई चपला ज्या त्याच्या नाहीत, तरीही सूरजने ते का करावं? सूरज सारखं कुणीही होऊ शकत नाही. (जे समाजवेगळे दिसतात, वागतात, बोलतात अशा सगळ्याना बोलणारे 90%) तो या शो मधे या सगळ्यांच प्रतिनिधित्व करतोय. तरीही सगळ्यांना आपला गेम खेळायचा आहे. पण तो हे सगळं बघून घाबरला आहे. हापशीवर (हँडपंप) होणाऱ्या भांडणापेक्षा हे लय बेकार आहे आणि एवढे सुंदर दिसणारे लोक असे का वागत असतील कदाचित ह्यात तो अडकलाय.
पुढे त्याने म्हटलं की, बाकी लोकांना भांडी घासता येत नाही म्हणून रडणारे आणि जरी तुझे जोडे नसतील तर ते बाजूला ठेव सांगणारे आणि माझे नाहीत मी नाही उचलणार म्हटल्यावर सुरजवर चढ चढ चढतात! बाकी जातीवाद, वर्णवाद आणि वर्गवाद, शिंपथी यावर मी बोलू शकत नाही एवढी माझी समज नाही.
अंकुरच्या या पोस्टमुळे त्याला सोशल मीडियावर मिळणाऱ्या सपोर्टची कल्पना येत आहे. किरण माने यांनी देखील त्याच्यासाठी एक पोस्ट केली होती. त्यातच निक्की आणि घरातले इतर ज्या प्रकारे त्याच्यासोबत वागत आहेत, त्यावरही तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचं चित्र आहे.
ही बातमी वाचा :
Bigg Boss OTT 3 : बिग बॉस ओटीटी 3 विजेती ठरली सना, 25 लाख बक्षीसासह आणखी लाखो रुपयांची कमाई