Marathi Serial : ओटीटी माध्यमाने स्वत:चा वेगळा ठसा उमटवला असला तरी मराठी मालिकांचादेखील एक वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. आजही कित्येक घरात संध्याकाळी 7 वाजता टिव्ही लावली जाते ती रात्रीपर्यंत सुरूच असते. घराघरांत उत्साहाने मालिका पाहिल्या जातात. आता याच मालिकांमध्ये रंजक वळणे येणार आहेत. येत्या रविवारी प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांचे एक तासाचे विशेष भाग रंगणार आहेत. 


'मन झालं बाजिंद', 'येऊ कशी तशी मी नांदायला', आणि 'देवमाणूस' या मालिकांचे एक तासाचे विशेष भाग रंगणार आहेत. 'देवमाणूस 2' या मालिकेच्या एक तासाच्या विशेष भागाने मालिकेचा महाआरंभ होणार आहे. प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलेली मालिका पुन्हा सुरू होणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसते आहे. 


'मन झालं बाजिंद' मालिकेच्या महाएपिसोडमध्ये विधाते कुटुंबातील सर्वजण हळदीच्या पूजेची तयारी करून शेतात जातात. दुसरीकडे राया कारखान्यातील भेसळ प्रकरणात गुन्हेगार असलेल्या ह्रतिक आणि पप्याला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा देणार. सोबतच राया कृष्णाला मानानं तिचं कारखान्यातील पद परत करणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.





'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेतील स्वीटू आणि ओम लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. मालिकेत सध्या आनंदी आनंद दिसून येत आहे. सध्या मालिकेत ओम आणि स्वीटूच्या लग्नाची लगबग दिसत आहे. कोकणच्या मातीत रंगलेल्या ओम आणि स्वीटूचा लग्नसोहळा हा एक तासाच्या विशेष भागाचं खास आकर्षण असणार आहे. 


संबंधित बातम्या


अजित दादांचा स्वॅगच लय भारी, विकी कौशलचं स्टारडमही पडलं फिकं, पाहा व्हिडीओ


Varsha Dandale : 'आयेंगे अच्छे दिन भी आयेंगे' म्हणत 'वच्छी आत्या'ने केली हटके पोस्ट


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha