मुंबई : विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. राजस्थान सवाई माधोपूर येथे 7 ते 9 डिसेंबर दरम्यान त्यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. 700 वर्षे जुन्या राजस्थानमधील किल्ल्यात दोघे लग्नबंधनात अडकले. लग्नासाठी जोधपूरला जात असताना दोघेही विमानतळावर दिसून आले होते. विमानतळावर दोघांनी फोटोसाठी छान पोझदेखील दिल्या. दरम्यान विमान तळावर अजित पवारदेखील उपस्थित होते. 


व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नक्की काय आहे?
लग्नासाठी जात असताना विकी मुंबई विमानतळाच्या  गेट वरती उभा आहे. त्याचे फोटो काढण्यासाठी तिथे गर्दी झाल्याचे दिसते आहे. या सर्वांसमोर विकी फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. मात्र व्हिडिओमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मागून येताना दिसत आहेत. तेव्हा सुरक्षा रक्षकांनी विकी कौशलला बाजूला होण्यास सांगितले. अजित पवारांचे तिकडे लक्ष गेले. मात्र अजित दादा कामाच्या धावपळीत थेट मोबाईवरती बोलत निघून गेल्याचे दिसत आहे.






सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे अजित पवारांचे समर्थक दादांचा अंदाजच वेगळा अशी प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी 9 डिसेंबर रोजी राजस्थानमधील रॉयल सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे सात फेरे घेतले. मेहंदी, हळदी, संगीत, लग्न अशा सर्व समारंभांना कतरिना आणि विकीच्या जवळच्या नातेवाईकांनी हजेरी लावली होती. पण दोघांच्या या शाही विवाह सोहळ्यात एकाही बॉलिवूड सेलिब्रिटीची उपस्थिती नव्हती. 


कोरोनामुळे दोघांनीही अगदी जवळच्या लोकांना लग्न समारंभासाठी आमंत्रित केले होते. पण आता दोघेही बॉलीवूडमधील त्यांच्या सर्व मित्रांसाठी एक भव्य रिसेप्शन आयोजित करतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. 


संबंधित बातम्या


Kareena Kapoor : क्वारंटाईन करिना कपूर झाली भावूक, पती आणि मुलासाठी इन्स्टावर स्टोरी पोस्ट करत म्हणाली...


Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha