Varsha Dandale : गेल्या अनेक दिवसांपासून छोट्या पडद्यावरच्या अभिनेत्री वर्षा दांदळे चर्चेत आहेत. सटल अभिनयामुळे वर्षा दांदळे ओळखल्या जातात. काही महिन्यांपूर्वी वर्षा दांदळे यांचा अपघात झाला होता. त्या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. आता वर्षा दांदळे यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. अशातच इंस्टाग्रामवर त्यांनी एक गंमतीदार पोस्ट केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.
वर्षा दांदळे सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. आयुष्यात घडणाऱ्या छोट्या-मोठ्या गोष्टी त्या नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतात. आता देखील त्यांनी एक कोलाज फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत त्यांच्या तब्येतीत सुधारणा झालेली दिसत आहे. तसेच त्यादेखील आनंदी दिसत आहेत. त्यांनी फोटो शेअर करत त्याला हटके कॅप्शनदेखील लिहिली आहे.
वर्षा दांदळेंनी फोटो शेअर करत लिहिले आहे,"येतील लवकरच चांगले दिवस येतील, फक्त गंमत करतेय. दिवस चांगलेच आहेत. आरामाचे… शांततेचे… आपल्या प्रियजनांसोबत…स्वप्नातील गप्पा मारण्याचे. चालणं हेच जीवन आहे आणि थांबलात की संपलात". 'नांदा सौख्य भरे' मालिकेत वर्षा दांदळेंनी साकारलेली भूमिका प्रचंड गाजली होती. मालिकेत त्यांनी 'वच्छि आत्या'चे पात्र साकारले होते. आजही त्यांचे चाहते त्यांना 'वच्छी आत्या'च्या नावाने ओळखतात.
संबंधित बातम्या
Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश
Premiere of Spider-Man No Way Home : स्पायडर मॅनच्या प्रीमियरनंतर Tom Holland भावूक; व्हिडीओ व्हायरल
Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाचा प्रीमिअर होणार यंदाच्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha