Amruta Khanvilkar On Me Honar Superstar Jallosh Juniors Cha : 'मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्स' (Me Honar Superstar Jallosh Juniors Cha) या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमातील छोट्या दोस्तांनी आपल्या जबरदस्त परफॉर्मन्सनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. अभिनेत्री, नृत्यांगणा अमृता खानविलकरदेखील (Amruta Khanvilkar) या कार्यक्रमातील स्पर्धकांच्या नृत्याच्या प्रेमात पडली आहे. 


श्रीमयीसाठी अमृताची खास पोस्ट


अमृता खानविलकरने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहित 'मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्स'चा या कार्यक्रमातील चिमुकल्या श्रीमयचं कौतुक केलं आहे. श्रीमयीच्या डान्सचा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं आहे, "चंद्रमुखी सिनेमातील 'चंद्रा' आणि 'बाई गं' ही दोन्ही अविस्मरणीय गाणी लोकप्रिय झाली. अनेक चाहत्यांसह छोट्या मुली या गाण्यावर नृत्य करताना दिसल्या आणि अजूनही दिसतात". 


अमृताने पुढे लिहिलं आहे, "मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्स'चा या कार्यक्रमात नुकतचं आठ वर्षाच्या श्रीमयी सूर्यवंशीने माझ्या अत्यंत प्रिय गाण्यावर हा मंत्रमुग्ध करणारा परफॉर्मन्स केला. खरं सांगू तर अशा चिमुकल्यांना जेव्हा लावणी अशाप्रकारे सादर करताना पाहते तेव्हा खूप आनंद होतो. या गोड छोट्या चंद्राला आभाळभर शुभेच्छा... खूप मोठी हो". 






अमृताच्या 'चंद्रमुखी'बद्दल जाणून घ्या...


अमृता खानविलकरचा 'चंद्रमुखी' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला होता. हा सिनेमा विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' (Chandramukhi) या कादंबरीवर आधारित आहे. राजकारणात मुरलेला नेता खा. दौलत देशमाने आणि एक लावणी कलावंत असणाऱ्या 'चंद्रा'ची प्रेमकहाणी या सिनेमात दाखवण्यात आली होती. 


अमृता खानविलकरच्या 'चंद्रमुखी' सिनेमातील 'चंद्रा' या लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेडलं लावलं आहे. चाहत्यांचे या लावणीवरील नृत्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. गायिका श्रेया घोषालने (Shreya Ghoshal) गायलेल्या या गाण्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. श्रीमयीआधी 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील परी अर्थात मायरा वैकुळचा 'चंद्रा' या लावणीवर डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Chandramukhi : चंद्रा येतेय पुन्हा घायाळ करायला; ब्लॉकबस्टर 'चंद्रमुखी'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर