Shiv Thakare On Bigg Boss 16 : 'बिग बॉस' (Bigg Boss) फेम शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या चर्चेत आहे. मराठी 'बिग बॉस' नंतर भाईजानचा 'बिग बॉस' गाजवणाऱ्या मराठमोळ्या शिव ठाकरेनं नुकताच इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधत त्यांचे आभार मानले आहेत. या लाईव्हदरम्यान शिवने लवकरच एका बिग बजेट सिनेमात झळकणार असल्याची घोषणा केली आहे.
सलमान खानच्या सिनेमात शिव ठाकरे झळकणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. यासंदर्भात माहिती देत शिव म्हणाला, "मी लवकरच एका बिग बजेट सिनेमात झळकणार आहे. तसेच, या सिनेमात मी एका सुपरस्टार सोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे". आता शिवचा आगामी सिनेमा कोणता असेल आणि या सिनेमात शिवसोबत कोणते कलाकार असतील, याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
शिव ठाकरे का लाजला?
शिव ठाकरेच्या लाईव्हदरम्यान त्याच्या एका चाहतीने त्याच्याकडे 'मला बॉयफ्रेंड शोधून दे', अशी मागणी केली आहे. चाहतीच्या या मागणीनंतर शिव निशब्द झाला. त्याला काय बोलावं ते सुचेनासं झालं. लाजत तो चाहतीला म्हणाला, "मी हे काम नाही करू शकत".
शिव ठाकरेने चाहत्यांचे मानले आभार!
इंस्टाग्राम लाईव्हदरम्यान शिव ठाकरेने चाहत्यांचेदेखील आभार मानले आहेत. चाहत्यांचे आभार मानत तो म्हणाला, "बिग बॉसच्या घरात मी प्रामाणिकपणे खेळण्याचा प्रयत्न केला. मी कसा खेळतो आहे याचा घरात असताना मला अंदाज नव्हता. पण बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर तुम्हा सर्वांचं प्रेम अनुभवलं. तुम्ही माझ्यावर केलेलं भरभरुन प्रेम आणि पाठिंब्यामुळे मी भारावून गेलो आहे. माझ्या सारख्या सर्वसामान्य माणसाला अर्थात आपल्या माणसाला पाठिंबा दिल्याबद्दल खूप-खूप आभार. या लाईव्हदरम्यान मी वचन देतो की, जिवंत असेपर्यंत कायम तुमच्यासोबत असेन".
शिव ठाकरेची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम
'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून शिव ठाकरे हे नाव घराघरांत पोहोचलं होतं. शिव प्रामाणिकपणे खेळत असल्याने तो या पर्वाचा विजेतादेखील झाला होता. त्यानंतर शिव हिंदी बिग बॉसमध्ये सहभागी झाला. त्यातही त्याची खेळी चाहत्यांच्या पसंतीस उतरली. शिवचा मोठा चाहतावर्ग असून ते त्यांच्या लाडक्या शिवच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. एकंदरीतच चाहत्यांमध्ये शिवची क्रेझ कायम आहे. शिवने इंस्टाग्रामवर नुकताच 2 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :