Kaun Banega Crorepati 14: बॉलिवूडचे महानायक म्हणजेच  अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)  यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन बिग बींना शुभेच्छा दिल्या आहेत. चित्रपटांबरोबरच अमिताभ हे छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतात. 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati)  या कार्यक्रमाचे ते सूत्रसंचालन करतात. या कार्यक्रमाचा सद्या 14 वा सीझन सुरु आहे. केबीसीच्या 14 व्या सीझनसाठी अमिताभ बच्चन हे किती रुपये मानधन घेतात? असा प्रश्न अनेकांना पडत असेल. जाणून घेऊयात त्यांच्या मानधनाबाबत...

  


एका एपिसोडसाठी बिग बी किती फी घेतात?
केबीसीची सुरुवात 2000 साली झाली. अमिताभ बच्चन यांनी या कार्यक्रमाच्या अनेक सीझनचे सूत्रसंचालन केलं आहे. बिग बी आता  केबीसीच्या 14 व्या सीझनचे देखील सुत्रसंचालन करत आहेत. या कार्यक्रमाची विविध सोशल मीडिया प्लॅटफॅार्मवर चर्चा होत असते. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन या कार्यक्रमाच्या प्रत्येक एपिसोड 4 ते 5 कोटी रुपये मानधन घेत आहे. 


25 लाखाच्या मानधनापासून केली होती सुरुवात
2000 साली जेव्हा केबीसीला सुरुवात झाली तेव्हा केबीसीचे पहिले सीझन होस्ट करण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी एका एपिसोडचे 25 लाख रुपये मानधन घेतले होते. पहिला सीझन हिट झाल्यानंतर अमिताभ यांनी त्यांची फी वाढवून 1 कोटी केली होती. रिपोर्टनुसार,केबीसीच्या 6 व्या आणि 7व्या सीझनसाठी त्यांनी 1.5 ते 2 कोटी रुपये मानधन घेतले होते. केबीसीच्या आठव्या सीझनसाठी त्यांनी 2 कोटी रुपये इतकी फी घेतली होती.तर अमिताभ बच्चन यांनी  9 व्या सीझनसाठी 2.6 कोटी, 10व्या सीझनसाठी 3 कोटी, आणि 11व्या 12व्या आणि 13व्या सीझनमध्ये 3.5 कोटी रुपये मानधन घेतले होते.


छोट्या पडद्यावरील कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या 14 व्या सिझनची सुरुवात 7 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज झाली. या सिझनमध्ये खेळाचे काही नियम बदलले आहेत. 'कौन बनेगा करोडपती 14' मध्ये स्पर्धकाला 7.5 कोटींसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहे. या प्रश्नाचं उत्तर स्पर्धकाने चुकीचं दिलं तर त्याला 75 लाख मिळणार आहेत.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: