Akshay Kumar : सध्या बॉलिवूडला ‘बॉयकॉट’चं ग्रहण लागलं आहे. यातच बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारचे (Akshay Kumar) चित्रपट सलग फ्लॉप ठरले आहेत. मात्र, आता त्याने आपल्या चित्रपटांच्या अपयशाचं खापर अभिनेता-कॉमेडियन कपिल शर्मावर (Kapil Sharma) फोडलं आहे. नुकताच अक्षय कुमारचा ‘कटपुतली’ (Cuttputli) हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अक्षय कुमारने कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली होती.
कॉमेडियन कपिल शर्मा लवकरच त्याच्या शोसह टीव्हीवर पुनरागमन करत आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या शोचा नवीन प्रोमोही रिलीज झाला होता, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कपिलच्या नवीन शोचे शूटिंगही जोशात सुरू आहे. अक्षय कुमार ‘द कपिल शर्मा शो’च्या नवीन सीझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये दिसणार आहे.
यंदाचं वर्ष अक्षय कुमारसाठी ‘फ्लॉप’
अक्षय कुमारसाठी यंदाचं वर्ष फार खास नव्हतं. या वर्षातला त्याचा चौथा चित्रपट 'कटपुतली' ओटीटीवर प्रदर्शित झाला असला, तरी या चित्रपटालाही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. या आधी त्याचे 'बच्चन पांडे', 'सम्राट पृथ्वीराज' आणि 'रक्षा बंधन' चित्रपटगृहात फ्लॉप झाले आहेत. नुकताच अक्षय कुमार त्याच्या ‘कटपुतली’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचला होता. यादरम्यान, तो कपिलला असे काही बोलला की, ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला.
अपयशाचं खापर कपिल शर्मावर...
‘द कपिल शर्मा शो’चा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोत अक्षय कुमारला पाहून कपिल शर्मा म्हणतो की, 'पाजी, तुम्ही प्रत्येक वाढदिवसाला एक वर्ष लहान कसे दिसता?’. या प्रश्नाला उत्तर देताना अक्षय कुमार म्हणाला, 'हा माणूस माझ्या प्रत्येक गोष्टीला खूप नजर लावतो. माझ्या पैशावर, माझ्या चित्रपटांवर... बघाना माझा कोणताही चित्रपट आता चालत नाहीय.' अक्षयचे हे उत्तर ऐकून कपिललाही थोडा धक्का बसला. मात्र, नंतर रकुल प्रीत आणि कपिल जोरजोरात हसायला लागले.
पाहा प्रोमो :
पहिल्याच भागात दिसणार अक्षय कुमार
गेल्या काही दिवसांपासून कपिल आणि त्याची टीम 'द कपिल शर्मा शो'च्या नव्या पर्वाची तयारी करत आहेत. 'द कपिल शर्मा शो'च्या येत्या पर्वातील पहिल्या भागात अक्षय कुमार सहभागी होणार आहे. 'द कपिल शर्मा शो'च्या आगामी भागात अक्षय त्याच्या आगामी 'कटपुतली' चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसून येणार आहे. त्यामुळे या भागात अक्षय कुमारसह रकुल प्रीत सिंह आणि सरगुन मेहतादेखील हजेरी लावणार आहेत.
संबंधित बातम्या