Bigg Boss Marathi 4 : छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi 4) लवकरच चौथ्या सीजनसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाच्या आगामी सीझनची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. ‘बिग बॉस सीझन 4’ची घोषणा झाल्यापासून चाहते आणि प्रेक्षक यावेळी घरात कोण कोण असणार याचे कयास बांधत आहेत. मात्र, आता चाहत्यांना आणखी काही काळ या शोची वाट पाहावी लागणार आहे. ‘बिग बॉस मराठी 4’ सप्टेंबर महिन्यात सुरु होणार अशी चर्चा होती. मात्र, हा याला आणखी थोडा विलंब लागणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.


'बिग बॉस मराठी 4' या कार्यक्रमाची घोषणा होताच त्याची चर्चा सुरू झाली आहे. आता पुन्हा एकदा स्पर्धकांचा बिग बॉसच्या घरातील 100 दिवसांचा प्रवास सुरू होणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील टास्क आणि वादांमुळे या शोने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या नव्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.


नेमका उशीर कशामुळे?


मीडिया रिपोर्टनुसार, सध्या हा शो ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीस सुरु होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. या शोची सगळी तयारी झाली असली, तरी अद्याप स्पर्धकांची नावे समोर आलेली नाहीत. सगळीकडे गणेशोत्सवाचा माहोल आहे, त्यामुळेच या सीझनला उशीर होणार असल्याचे बोलले जात आहे. तर, काही कलाकरांना विचारणा करण्यात आली आहे, मात्र अद्याप त्यांनी आपले निर्णय कळवलेले नाहीत. यामुळे देखील ‘बिग बॉस मराठी सीझन 4’ (Bigg Boss Marathi 4)  लांबणीवर पडू शकतो असे म्हटले जात आहे.


‘बिग बॉस मराठी 4’चा नवा सीझन या महिन्याच्या 25 तारखेपर्यंत सुरु होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, आता हा शो निर्मात्यांनी लांबणीवर टाकल्याचे सांगितले जात आहे. सहभागी होणाऱ्या कलाकारांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे देखील या सीझनला उशीर होणार असल्याचे सांगितले जात आहे.


महेश मांजरेकरांच्या हातीच सूत्रसंचालनाची धुरा!


चौथा सीझन महेश मांजरेकर होस्ट करणार का? यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मागील तिन्ही पर्व महेश मांजरेकरांनी होस्ट केले आहेत. गतवर्षी कर्करोगामुळे महेश मांजरेकरांनी काही भागांमधून ब्रेक देखील घेतला होता. त्यामुळे चौथ्या सीझनची धुरा महेश मांजरेकर सांभाळतील का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. अखेर कलर्स मराठीने महेश मांजरेकर होस्ट करणार असल्याचे प्रोमो शेअर केले आहेत. महेश मांजरेकरच 'बिग बॉस मराठी 4' होस्ट करणार असल्याने चाहते देखील आनंदी झाली आहेत.  



संबंधित बातम्या


Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीचा चौथा सीझन 'या' दिवशी पासून होणार सुरू; 'सूर नवा ध्यास नवा' अंतिम टप्प्यात


Mahesh Manjrekar : बिग बॉसच्या एका आठवड्यासाठी महेश मांजरेकर किती मानधन घेतात? जाणून घ्या...