Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka ooltah Chashmah) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. गेल्या काही दिनवसांपासून हा शो चर्चेत आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील अनेक कलाकारांनी हा शो सोडण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री दिशा वकानीनं (Disha Vakani) देखील ही मालिका सोडली. दिशा या मालिकेमध्ये दयाबेन (Dayaben) ही भूमिका साकारत होती. आता दयाबेन ही भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार आहे? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. आता लवकरच दिशा वकानी यांना एक अभिनेत्री रिप्लेस करणार आहे. 


दिशा वकानी या काही दिवसांपूर्वी दुसऱ्यांदा आई झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांपूर्वी दिशा यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमधून एक्झिट घेतली होती. आता दयाबेन या भूमिकेसाठी अभिनेत्री ऐश्वर्या सखूजाचं (Aishwarya Sakhuja) नाव शॉर्ट लिस्ट करण्यात आसं आहे. ऐश्वर्यानं दयाबेन या भूमिकेच्या लूक टेस्टमध्ये केलेलं काम मालिकेच्या निर्मात्यांना आवडलं आहे. पण अजून मालिकेच्या निर्मात्यांनी आणि ऐश्वर्यानं अजून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. 




राखी विजानच्या नावाची चर्चा


अभिनेत्री राखी विज ही दयाबेन ही भूमिका साकारणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. पण राखीनं ही अफवा असल्याचं सांगितलं होतं. राखी विजाननं तिचा आणि दिशा वकानीचा फोटो असलेल्या एका बातमीचा स्क्रिनशॉट शेअर केला होता. या पोस्टमध्ये राखीनं लिहिलं, 'ही अफवा आहे. मी हे ऐकून थक्क झाले होते. मला मालिकेच्या प्रोड्यूसरकडून किंवा चॅनलकडून अजून कोणीही अप्रोच केलं नाही. ' 90 च्या दशकातील हिट मालिका 'हम पांच' मधील‘स्वीटी माथूर’या भूमिकेमुळे राखी विजानला विशेष लोकप्रियता मिळाली. 


28 जुलै 2008  रोजी  तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.


हेही वाचा :