Sundara Manamadhe Bharli: सुंदरा मनामध्ये भरली (sundara manamadhe bharli)   या छोट्या पडद्यावरील मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या मालिकेमधील लतिका आणि अभिमन्यु या जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेत्री अदिती द्रविडने (Aditi Dravid) या मालिकेमध्ये नंदिनी ही भूमिका साकारली. अदितीनं नुकतेच इन्स्टाग्रामवर आस्क मी एनिथिंग हे सेशन घेतलं. या सेशनमध्ये अदितीनं नेटकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. अदितीनं चाहत्यांच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे.


 “सुंदरा मनामध्ये भरली" मालिकेसाठी किती मानधन मिळालं? असा प्रश्न एका नेटकऱ्यानं अदिती द्रविडला इन्स्टाग्रामवर विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना अदितीनं सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील कलाकारांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, , “सुंदराची माझी कमाई.” 




'मीरा चित्रपट कधी येणार' असा प्रश्न देखील एका युझरनं विचारला. या प्रश्नाचं उत्तर देत अदिती म्हणाली,"लवकरच" अदितीच्या मीरा या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.




 अक्षया नाईक (Akshaya Naik) ,समीर परांजपे (Sameer Paranjape) ,  अतिशा नाईक या कलाकारांनी सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारली. या मालिकेच्या कथानकाला आणि मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमुळे अदितीला विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेमध्ये अदितीनं शनायाची मैत्रीण म्हणजेच ईशाची भूमिका साकारली होती. तसेच सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत तिनं साकारलेल्या नंदिनी या भूमिकेचं देखील अनेकांनी कौतुक केलं.  अदितीला इन्स्टाग्रामवर 263K फॉलोवर्स आहेत. अदितीच्या सोशल मीडियावरील पोस्टवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. 






अदिती सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. अदितीच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.  अदिनीनं बाईपण भारी देवा (Baipan Bhaari Deva) या चित्रपटामधील  'मंगळागौर' हे गाणं  लिहिलं आहे. तिच्या या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.


इतर महत्वाच्या बातम्या:


Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' सिनेमातलं गाजत असलेलं 'मंगळागौर' गाणं लिहिलंय अभिनेत्री आदिती द्रविडने; युट्यूबवर होतंय ट्रेंड