Shiv Thakare Priyanka Chahar Choudhary : छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो बिग बॉस सीझन 16 आता अंतिम टप्प्यात आला आहे. शोच्या फिनालेला आता अवघे काही आठवडे बाकी आहेत. बिग बॉसचा 16 वा सीझन जिंकण्यासाठी सर्व स्पर्धक मेहनत घेत आहेत. दरम्यान, बिग बॉसच्या घरात शिव ठाकरे आणि टेलिव्हिजन अभिनेत्री प्रियांका चहर चौधरी यांच्यात जोरदार वादावादी झाली आहे. एवढेच नाही तर, शिव ठाकरेने प्रियंका चौधरीला बिग बॉस फेम दिवंगत अभिनेता 'सिद्धार्थ शुक्लाची कॉपी करू नकोस', अशी सूचनाही प्रियंकाला दिली आहे. 

Continues below advertisement

प्रियंका म्हणाली- 'मी सोलो खेळते'

नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये शिव आणि प्रियांकामध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. या ठिकाणी शिवने प्रियांकाला बिग बॉस 13 चा विजेता अभिनेता 'सिद्धार्थ शुक्लासारखी वागू नको' असे सांगितले. हे सर्व नॉमिनेशन टास्क दरम्यान घडले. lतेव्हा प्रियांका म्हणाली, की संपूर्ण ग्रूप नेहमी मला टार्गेट करतो. म्हणूनच ती सोलो खेळते. प्रियांकाच्या बोलण्याने नाराज झालेला शिव ठाकरे प्रियांकाला सिडची (सिद्धार्थ शुक्ला) नक्कल करणे थांबवण्यास सांगत होता. 

Continues below advertisement

सिद्धार्थ शुक्लाच्या चाहत्यांनी दिल्या 'या' प्रतिक्रिया

सिद्धार्थ शुक्लाच्या चाहत्यांनी शिवच्या या प्रकरणावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एकीकडे युजर्सनी शिवचे कौतुक केले तर दुसरीकडे उगाच सिद्धार्थ शुक्लाचे नाव घेतल्याबद्दल सांगितले. तर, काही लोक शिव ठाकरेवर संतापले.

एका यूजरने लिहिले की, 'शिव ठाकरे हा सिद्धार्थ शुक्लाचा खूप मोठा फॅन दिसत आहे..'

दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'शिव ठाकरे त्याचं फ्लॉप करिअर वाचवण्यासाठी सिडचे नाव घेत आहे.' 

फिनालेबद्दल बोलायचे झाल्यास रिपोर्ट्सनुसार 12 फेब्रुवारीला महाअंतिम सोहळा होणार आहे. सध्या शिव, टीना, शालिन आणि प्रियांका डेंजर झोनमध्ये आहेत. असेही म्हटले जात आहे की या आठवड्यात सलमान खानच्या जागी फराह खान 'वीकेंड का वार' एपिसोड होस्ट करण्यासाठी शोमध्ये परतणार आहे.