Shubh Vivah Serial : 'शुभविवाह' (Shubh Vivah) ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेतील वेगवेगळ्या वळणांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या मालिकेत नुकताच एक प्रसंग चित्रित झाला आहे. यात मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात आकाश चक्क मंदिराच्या कळसावर चढतो. आपला जीव धोक्यात घालून निरागस जीवाला वाचवण्याची आकाशची धडपड असते. आकाश धाडसाने कळसावर चढतो खरा मात्र त्यानंतर भीतीने त्याची गाळण उडते. याप्रसंगी भूमी येऊन आकाश आणि मांजरीचा जीव वाचवते.

Continues below advertisement

मालिकेत दाखवल्या गेलेल्या या प्रसंगाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. सिनेमामध्ये अशा पद्धतीचे स्टण्ट सीक्वेन्स आपण पहात असतो. मात्र 'शुभविवाह' मालिकेच्या संपूर्ण टीमने हे आव्हान स्वीकारत हा धाडसी प्रसंग पूर्ण केला आहे. त्यामुळे सध्या मालिकेतील कलाकारांचं सर्वत्र कौतुक होत आहे. 

फाईट मास्टरच्या मार्गदर्शनाखाली शूटिंग पूर्ण!

भूमी आणि आकाशचं म्हणजेच अभिनेत्री मधुरा देशपांडे (Madhura Deshpande) आणि यशोमान आपटेचं (Yashoman Apte) मनोरंजनक्षेत्रातील विविध मंडळींसह मालिकाप्रेमींकडून विशेष कौतुक होत आहे. बॉडी डबल न वापरता या दोघांनीही हा सीन पूर्ण केला आहे. अर्थातच हा सीन शूट करताना सर्वोतोपरी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. काही मिनिटांचा हा सीन कित्येक तास सुरू होता. दिग्दर्शक आणि फाईट मास्टरच्या मार्गदर्शनाखाली या सीनचं शूटिंग करण्यात आलं आहे. 

Continues below advertisement

अभिनेता यशोमान आपटे आणि मधुरा देशपांडे या दोन्ही कलाकारांनी अशी पद्धतीचा सीन पहिल्यांदाच केला आहे. याबद्दल बोलताना यशोमन म्हणाला,"सुरुवातीला खूप भीती वाटत होती. मात्र मालिकेतील संपूर्ण टीमच्या सहकार्यामुळे आणि उत्तम नियोजनामुळे हा सीन पूर्ण करू शकलो". 

'शुभविवाह' ही मालिका 16 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आजवर रोमॅंटिक हिरोच्या भूमिकेत झळकलेल्या यशोमनने या मालिकेत मानसिक स्थैर्य गमावलेल्या आकाशची भूमिका साकरली आहे. या भूमिकेसाठी तो खूप मेहनत घेत आहे.  

शुभविवाहकुठे पाहू शकता? स्टार प्रवाहकिती वाजता? दुपारी दोनकधीपासून? 16 जानेवारी

संबंधित बातम्या

Shubhvivah : यशोमन आपटेचं छोट्या पडद्यावर कमबॅक; 'शुभविवाह' मालिकेत साकारणार मानसिक स्थैर्य गमावलेल्या आकाशची भूमिका