Bigg Boss Marathi New Season : बिग बॉसच्या घरातल्या (Bigg Boss Marathi New Season) राड्यांची, मैत्रीची पहिल्याच दिवसांपासून चर्चा होतेय. प्रत्येक दिवसाला आणि प्रत्येक क्षणाला बिग बॉसच्या घरातली नाती ही बदलताना दिसत आहेत. त्यामुळे बिग बॉसच्या घरातली समीकरणं ही प्रत्येकाला संभ्रमात टाकणारी ठरतायंत. त्यामुळे बिग बॉसही घऱातील सदस्यांना वारंवार ताकीद देतानाही दिसत आहे. पण नुकत्याच घडलेल्या एका प्रकारमुळे पुन्हा एकदा बिग बॉसच्या घराची वेगळीच चर्चा सुरु झालीये.
जान्हवी आणि निक्कीमध्ये मागच्या आठवड्यापासून खटेक उडत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे त्या दोघींच्याही मैत्रीची समीकरणं बदलली. पण निक्की घरातील काही ठरावीकच काम करत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे तिने जर कामं केली नाहीत तर मी बनवलेलं जेवण तिला देणार नाही, तिने तिचं स्वत: बनवून घ्यावं. त्यावर घरात बरेच राडे झाल्याचं पाहायला मिळालं. पण जान्हवी चहा बनवत असतानाच बिग बॉसने तिला निक्कीसाठीही चहा बनवायला सांगतिला. यावर बिग बॉसचा माजी स्पर्धक आणि अभिनेता अभिजीत केळकर याची पोस्ट सध्या चर्चेत आलीये.
अभिजीतची पोस्ट नेमकी काय?
अभिजीतने त्याच्या सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'Bigg Boss पडलाय प्रेमात आणि प्रेम असतं XXX… त्यामुळे ‘आता’ कुठल्याही नियमांचं उल्लंघन झालेलं त्याला दिसत नाही. घरातलं समान उचलून आपटलं, लाथ मारून पाडलं. शारीरिक हिंसा झाली तरी ‘आता’ त्याला कोणीच Unfair वाटत नाही… तो ‘आता’ स्वत:चाच इतिहास विसरलाय. ‘आता’ त्याला लागतो तो फक्त प्रेमाचा चहा.'
दरम्यान अभिजीतच्या या पोस्टवर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या प्रतिक्रियेतून अभिजीतच्या पोस्टवरही सहमतीही दर्शवली आहे. एका युजरने कमेंट करत म्हटलं की, 'खरंय.... पण मला एक कळत नाही इतका मूर्खपणा सुरु आहे.' दुसऱ्या एका युजरने कमेंट करत म्हटलं आहे की, त्या निक्की ला जास्ततच फेवर केला जातोय. बिग बॉसकडून पण आणि रितेश देशमुखकडून पण. माझ्या डोक्यात जाते ती निक्की. हिला बाहेर काढा आधी..
ही बातमी वाचा :