Actor 200  Crores Fees: बालीवुड सेलिब्रेटी (Bollywood Celebrities) असोत किंवा साऊथचे स्टार्स, प्रत्येकजण आपल्या सिनेमांसाठी प्रचंड मानधन घेतात. पण तुम्हाला माहित आहे का की, देशातील कोणत्या अभिनेत्याने आपल्या चित्रपटासाठी 200 कोटी रुपये शुल्क आकारले होते? विशेष म्हणजे यामध्ये शाहरुख (Shah Rukh Khan) किंवा रजनीकांतचं नाव नाही. यामध्ये कोणाचा समावेश आहे, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 


 हा दुसरा कोणी नसून साऊथचा सुपरस्टार थलपथी विजय आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट देऊन प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे. त्याचा आगामी चित्रपट 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम' (GOAT) या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट 5 सप्टेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला. व्यंकट प्रभू दिग्दर्शित या चित्रपटात थलपथी विजय, प्रशांत, प्रभू देवा, मोहन आणि जयराम यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. एआयच्या मदतीने विजयकांतही कॅमिओमध्ये दिसणार आहे.


थलपती विजय घेतो 200 कोटींचं मानधन 


या चित्रपटाची अधिकृत घोषणा मे 2023 मध्ये 'थलापथी 68' या तात्पुरत्या शीर्षकाखाली करण्यात आली होती. प्रॉडक्शन हाऊसचा हा 25 वा चित्रपट असून 300-400 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम' (GOAT) या चित्रपटातील दुहेरी भूमिकेसाठी थलपथी विजयला 150 कोटी रुपये मानधन दिले जात असल्याच्या बातम्या यापूर्वी आल्या होत्या. मात्र, आता निर्मात्या अर्चना कलापथी यांनी या चित्रपटासाठी अभिनेत्याच्या मानधनाविषयी भाष्य केलं आहे. 


एका मुलाखतीत, चित्रपट निर्मात्या अर्चना कलापथी यांनी खुलासा केला आहे की, थलपथी विजयला "द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम" साठी 200 कोटी रुपये मानधन मिळाले होते. यासह, थलपथी विजय हा शाहरुख खान, सलमान खान, प्रभास, अल्लू अर्जुन, रजनीकांत आणि आमिर खान यांच्यापेक्षा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता बनला आहे.


थलपथी विजयला का दिलं 200 कोटींचं मानधन?


निर्मात्या अर्चना कलापथी यांनी त्याला इतकं मानधन का दिलं याबाबतही खुलासा केला आहे. त्यांनी म्हटलं की,  अभिनेत्याच्या मागील चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवरील कामगिरीचा विचार करून एवढं मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षीच 'लिओ' हा बॉक्स ऑफिसवर 200 कोटींहून अधिक कमाई करणारा थलपथी विजयचा ७वा चित्रपट ठरला. त्याचे सलग 7 चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आहेत आणि त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 2000 कोटींहून अधिक कमाई केली आहे.


ही बातमी वाचा : 


Pravin Tarde : 'आता परीक्षा देवाची...,' देऊळ बंदच्या दुसरा भाग येणार, प्रवीण तरडेंनी केली मोठी घोषणा