Kitchen Kallakar : 'किचन कल्लाकार' (Kitchen Kallakar) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची उडणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना खूप मजा येत आहे. प्रेक्षक आपल्या लाडक्या कलाकारांना या कार्यक्रमात किचनमध्ये धावपळ करताना पाहतात. पण 'किचन कल्लाकार'च्या आगामी भागात अभिजित बिचुकले, तृप्ती देसाई आणि जयवंत वाडकर येणार आहेत. 


अभिजित बिचुकले, तृप्ती देसाई आणि जयवंत वाडकर या तिघांमध्ये पाककलेची चांगलीच चुरस रंगणार आहे. एका खेळादरम्यान अभिजित बिचुकलेसमोर डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो ठेवण्यात आला. तर ट्रम्प यांचा फोटो पाहताच बिचुकले म्हणाला, हे तर आमचे तात्या.. आमच्या गावाकडचे. अत्यंत हुशार आणि चांगला माणूस." त्यानंतर मंचावर चांगलाच हशा पिकला. बिचुकलेचे हे विधान सध्या चर्चेत आहे. 






महाराज नेहमी कलाकारांना काहीतरी कठीण पदार्थ करायला लावतात. 'किचन कल्लाकार'च्या मंचावर नेहमीच नवनवीन प्रयोग होत असतात. या मंचावर कधी राजकारणी नेते येतात, तर कधी बच्चे कंपनी त्यामुळे प्रेक्षकदेखील 'किचन कल्लाकार' या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतात.


संबंधित बातम्या


Kitchen Kallakar : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सासूबाईंनी लावली 'किचन कल्लाकार'च्या मंचावर हजेरी


Kitchen Kallakar : किचन कल्लाकारच्या किचनमध्ये पुन्हा होणार बच्चेकंपनीचा कल्ला