Abhidnya Bhave : मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे(Abhidnya Bhave) सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते. अभिज्ञाचा पती  मेहुल पै (Mehul Pai) सध्या कॅन्सरशी झुंज देत आहे.  नुकताच अभिज्ञानं मेहुलसोबतचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिज्ञा मेहुलसोबत एक गेम खेळताना दिसत आहे. 

Continues below advertisement


अभिज्ञानं मेहुलसोबतचा खास व्हिडीओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'थेरपीच्या काळात आम्ही अशा प्रकारे वेळ घालवतो.' तिनं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट करून नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक केलं आहे. अभिनेता सुयश टिळकनं या व्हिडीओला 'More power', अशी कमेंट केली. तर अभिनेत्री मयुरी देशमुख, सुखदा खांडकेकर, तेजस्विनी पंडित यांनी देखील अभिज्ञानं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत. 






 6 जानेवारी 2021 रोजी अभिज्ञा आणि मेहुल यांनी लग्नगाठ बांधली. लग्नाआधी 15 वर्ष हे दोघे एकमेकांना ओळखत होते.  कॉलेजनंतर त्यांचा संपर्क तुटला होता.  हे दोघे पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर अभिज्ञा आणि मेहुल यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अभिज्ञा मेहुलसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमी शेअर करते. 


हेही वाचा :