Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'चं चौथं पर्व (Bigg Boss Marathi 4) नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून सगळीकडे 'बिग बॉस मराठी 4'ची चर्चा सुरू आहे. कालच्या भागात त्रिशूल, मेघा, रोहित आणि प्रसाद हे चार सदस्य निरुपयोगी ठरले होते. पण बिग बॉसने सदस्यांना 'रुम ऑफ फॉर्च्युन' हे खास सरप्राईझ दिले. आजच्या भागात 'आटली बाटली फुटली' हे नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. 


'रुम ऑफ फॉर्च्युन' म्हणजे नक्की काय?


'रुम ऑफ फॉर्च्युन'मध्ये निरुपयोगी ठरलेल्या सदस्यांना चार दरवाजे दाखविले गेले. त्यातून त्यांना एका दरवाज्याची निवड करायची होती. त्यानुसार आता चारही सदस्यांना आता घरातील सगळी कामे करावी लागणार आहेत. पण यासोबत त्यांना एक पॉवरदेखील मिळाली आहे. त्यामुळे आता सदस्य पॉवरचा कसा उपयोग करणार? कोणाला नॉमिनेट करणार हे बघणं रंजक असणार आहे. 


'आटली बाटली फुटली' प्रोमो आऊट


'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात 'आटली बाटली फुटली' हे नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट झाला आहे. प्रोमोनुसार, नॉमिनेशन कार्यादरम्यान अमृता देशमुखने सदस्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. ती म्हणत आहे, माझ्यावर येऊन बाटल्या फोडत आहात. हे चांगलं दिसत नाही आहे". 






'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वातील पहिल्या आठवड्यात कोणते सदस्य सेफ होणार आणि कोणते सदस्य नॉमिनेट होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. एक घर, 100 दिवस आणि 16 स्पर्धकांचा प्रवास आता सुरू झाली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता मनोरंजनाची चांगलीच मेजवानी मिळत आहे. 


संबंधित बातम्या


Bigg Boss Marathi 4 : 'ऑल इज वेल' म्हणत 'बिग बॉस'चं दार उघडलं; स्पर्धक म्हणून कोणाकोणाची एन्ट्री?


Bigg Boss Marathi Contestant : मेघा घाडगे ते 'शेवंता' फेम अपूर्वा नेमळेकर; 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची नावं जाणून घ्या...