Bigg Boss 16 Contestant Abdu Rozik Net Worth : 'बिग बॉस' (Bigg Boss) या छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रमाचं सोळावं पर्व (Bigg Boss 16) नुकतचं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. यंदाच्या पर्वात अब्दु रोजिकने (Abdu Rozik) प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'बिग बॉस'च्या घरात आणि घराबाहेरदेखील अब्दुची चर्चा होत आहे. 19 वर्षीय अब्दु कोट्यवधींचा मालक आहे. जाणून घ्या त्याची संपत्ती...


युट्यूबर अब्दु रोजिक 'बिग बॉस 16'मध्ये सहभागी झाला आहे. आजवर अब्दुने आपल्या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. सोशल मीडियावरदेखील त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर त्याचे 3.9 मिलीयन फॉलोअर्स आहेत. अब्दु गायक असण्यासोबत एक उत्तम ब्लॉगर आणि बॉक्सरदेखील आहे. 


कोट्यवधींच्या मालक अब्दु!


रिपोर्टनुसार, अब्दु दोन कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. तो त्याच्या युट्यूब चॅनलवर गाणी रिलीज करण्यासोहत रील्सदेखील बनवतो. त्यामुळे त्याच्या कमाईतदेखील भर पडते. आज कोट्यवधींचा मालक असलेल्या अब्दुला रीकेट्स नावाचा आजार झाला होता. त्यामुळे त्याची उंची वाढली नाही.  






अब्दु लोकप्रिय कसा झाला?


अब्दु राजिक त्याच्या युट्यूब चॅनलवर नेहमीच त्याच्या गाण्यांचे व्हिडीओ शेअर करत असतो. 'ओह दिली जोर' या गाण्यामुळे अब्दु रातोरात स्टार झाला आहे. टिक टॉकवरदेखील तो अनेक व्हिडीओ शेअर करत असतो. त्याचं प्रत्येक गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरतं. सध्या 'बिग बॉस 16'मुळे अब्दु घराघरांत पोहोचला आहे. 


अब्दु राजिक 'बिग बॉस 16'मध्ये चांगलाच धिंगाणा घालत आहे. अब्दुने सलमान खानसोबत 'कभी भाई कभी जान' या सिनेमातदेखील काम केलं आहे. जगभरात अब्दुने अनेक रेकॉर्ड केले आहेत. सलमान, एआर रहमान, सोनू सूद, टायगर श्रॉफ आणि यो यो हनी सिंहसह अनेक सेलिब्रिटी अब्दुचे चाहते आहेत. 


संबंधित बातम्या


Bigg Boss 16 : 'बिग बॉस'ने पहिल्याच दिवशी मोडला नियम; स्पर्धक नाराज


Bigg Boss 16: मान्या सिंहने उघडले ग्लॅमर दुनियेचे रहस्य, मिस इंडिया होऊनही मिळाले नाही काम!