Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरातून (Bigg Boss Marathi New Season) तिसऱ्या आठवड्यात योगिता चव्हाण (Yogita Chavan) आणि निखिल दामले या दोन सदस्यांनी निरोप घेतला होता. त्या तीन आठवड्यांमध्ये आर्या जाधव (Aarya Jadhao) आणि योगिता चव्हाण या दोघींची चांगली मैत्रीही झाली होती. पण योगिताने घराचा निरोप घेतल्याने घरातील त्या दोघींचा एकत्र प्रवास तिथेच संपला. पण काही दिवसांपूर्वी आर्याने निक्कीला (Nikki Tamboli) थोबाडीत मारल्यामुळे बिग बॉसने तिलाही घराबाहेर काढलं.
त्यामुळे सध्या आर्या आणि योगिता या दोघींचाही खेळ आता संपला आहे. म्हणूनच घरातून बाहेर आल्यावर आर्या तिच्या लाडक्या मैत्रीणीला भेटायला तिच्या घरी गेली. नुकताच आर्या आणि योगिताने त्यांच्या सोशल मीडियावर त्यांचे व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यामुळे आर्या आणि निक्कीची मैत्री आता घराबाहेरी कायम राहिल्याचं पाहायला मिळतंय.
बिग बॉसच्या घरात झाली मैत्री
आर्या आणि निक्की या बिग बॉसच्या घरात एकमेकींच्या जवळ आल्या. पण आधी योगिता बाहेर पडल्यामुळे त्या दोघींची एकत्र सहवास तिथेच संपला. पण घरातून बाहेर पडल्यानंतर आर्या न चुकता योगिताच्या भेटीला गेली. यावेळी दोघींनीही एकमेकींना घट्ट मिठी मारल्याचं पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे दोघींच्याही डोळ्यात पाणी होतं.
आर्या बिग बॉसच्या घराबाहेर
बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सीचा टास्क रंगला होता. त्यामध्ये घरातल्यांना मोती ताब्यात घेऊन एका सदस्याला कॅप्टन्सीच्या शर्यातीमधून बाद करायचं होतं. त्यावेळी बाथरुमध्ये निक्की आणि आर्याचा वाद सुरु असताना निक्कीने आर्याला धक्का दिला. त्यावर राग अनावर होऊन आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली. बिग बॉसच्या घरात हिंसा न करणं हा मूलभूत नियम आहे. पण आर्याने या नियमांचं उल्लंघन केलं. त्यामुळे बिग बॉसने आर्यावर कारवाई करत तिला घराबाहेर काढलं.
'मी तिला खूप जोरात ठेवून दिली...'
आर्याने नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. त्यामध्ये तू निक्कीला नेमकं कसं मारलंस? म्हणजे चापटी मारली, ते काही सेकंदात घडलं की सणसणीत ठेवून दिलीस. यावर उत्तर देताना आर्याने निक्कीला सणसणीत ठेवून दिल्याची कबुली दिली. आर्याने म्हटलं की, मी तिला खूप जोरात ठेवून दिली. पण आता मला या गोष्टीची लाज वाटतेय. कारण कुणावरही हात उगारणं चुकीचंच आहे. अर्थात ते काही क्षणात सगळं घडलं. मी तेव्हाही म्हटलं की, मी निक्की नाहीये तर ते माझ्याकडून व्हायला नव्हतं पाहिजे. पण जरी हिंसा चुकीची असली तरीही निक्की ते सगळं डिसर्व्ह करते.