Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Arundhati Madhurani Prabhulkar : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आजही या मालिकेची क्रेझ कायम आहे. या मालिकेत अरुंधती मुख्य भूमिकेत दिसत आहे. या मालिकेच्या माध्यमातून अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) मुख्य भूमिकेत आहे. 


'आई कुठे काय करते' मालिकेतील अरुंधतीच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदार कोण आहे? (Aai Kuthe Kay Karte Madhurani Prabhulkar Real Life Partner) 


'आई कुठे काय करते' या मालिकेतील अरुंधतीच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदार कोण आहे याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. तर अरुंधतीच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदार प्रमोद प्रभुलकर (Pramod Prabhulkar) एक लोकप्रिय दिग्दर्शक आहे. 


मधुराणी प्रभुलकर आणि प्रमोद प्रभुलकरची लव्हस्टोरी काय आहे? 


मधुराणी प्रभुलकर आणि प्रमोद प्रभुलकर यांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. मधुराणी एक अभिनेत्री आहे. तर प्रमोद हा दिग्दर्शक आहे. 'इंद्रधनुष्य' या मालिकेच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली. त्यावेळी या मालिकेचं सहाय्यक दिग्दर्शन प्रमोद करत होता. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 






मधुराणी आणि प्रमोदला एक मुलगी आहे. तसेच दोघे सध्या अभिनय प्रशिक्षणाच्या शिबिराचं आयोजन करताना दिसतात. त्यांनी त्यांच्या अॅक्टिंग वर्कशॉपमधून अनेक कलाकारांना मराठी मनोरंजनसृष्टीत संधी दिल्या आहेत. यात हृता दुर्गुळेपासून शिवानी बावकरपर्यंत अनेक कलाकारांचा समावेश आहे.  


मधुराणी प्रभुलकर  यांचा सिनेप्रवास... (Madhurani Prabhulkar Movies)


मधुराणी प्रभुलकर एक उत्कृष्ट अभिनेत्री असण्यासोबत गायिका आणि संगीतकारदेखील आहे. आजवर त्यांनी अनेक लोकप्रिय मालिका आणि सिनेमांत काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी पहिली एकांकिका लिहिली होती. या एकांकिकेसाठी त्यांना 'पुरुषोत्तम करंडक' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी मनोरंजनसृष्टीत काम करण्याचा निर्णय घेतला. 'नवरा माझा नवसाचा' या सिनेमादेखील त्या महत्त्वाच्या भूमिकेत होत्या. 


संबंधित बातम्या


Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते फेम मधुराणी प्रभुलकर यांची खास पोस्ट; म्हणाल्या, 'माझी ही अवस्था ईश्वराला समजली असणार...'