Aai Kuthe Kay Karte 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतील देशमुख कुटुंब सध्या चिंतेत आहे. मालिकेच्या गेल्या एपिसोडमध्ये दिसले की,  यशच्या घरी पोलीस आले आहेत. ते पोलीस म्हणतात, 'आम्हाला यश देशमुखला पोलीस स्टेशनला घेऊन जाण्याची ऑर्डर मिळाली आहे. यश देशमुखनं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.' त्यानंतर देशमुख कुटुंब पोलिसांना सांगते की, यशचा अपघात झाला आहे. आता  आई कुठे काय करते या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, आजी आणि आप्पा हे यशची काळजी घेतल्याबद्दल आशुतोषचे आभार मानत आहेत. 


'आई कुठे काय करते' या मालिकेच्या प्रमोमध्ये दिसत आहे की, आशुतोष हा आजी आणि अप्पांना म्हणतो,  'मी निघतो. यशची सगळी औषधं मी ईशाकडे दिली आहेत. यश आता आराम करतोय. तुम्ही देखील आराम करा' यावर अप्पा म्हणतात, 'कसं आराम करणार, यश समोर जायची सुद्धा भिती वाटते. पोलीस म्हणाले ते सगळं खरं असेल तर मी काय तोंड घेऊन त्याच्या समोर जाऊ. यशसारख्या उत्साही तरुणानी असा विचार केला तर ते आमच्या सगळ्यांचे अपयश आहे. माझं अपयश आहे.'


आशुतोष अप्पांना म्हणतो, 'अप्पा, यशनं असं काहीही केलेलं नाही. यशला Counseling ची  गरज आहे. यश ज्या वयातून जात आहे त्या वयातून आपण सर्वजण गेलो आहोत. परीक्षेत नापास झालो, कामात यश आलं नाही तर काय करायचं याचा सल्ला आपण देतो. पण हेच जर नात्यांच्याबाबत घडलं तर, म्हणजेच नाती तुटली, माणसं लांब गेली तर त्यातून कसं बाहेर यायचं, याचं शिक्षण कुठेच मिळत नाही.'






कांचनताई अशुतोषला म्हणतात, 'अशुतोषराव मला तुमचे आभार कसे मानावेत हेच कळत नाहीये. यशला घरी आणण्याचा निर्णय तुम्ही का घेतला? हे मला आता कळतंय. योग्यवेळी तुम्ही त्याला घरी घेऊन नसता आला, तर आजची रात्र त्याला तुरुंगात काढावी लागली असती.' अप्पा म्हणतात, 'आशुतोष राव तुम्ही दुसऱ्यांदा यशचा जीव वाचवला आहे.'


संबंधित बातम्या


Aai Kuthe Kay Karte: यशची अवस्था बघून अनिरुद्ध झाला भावूक; 'आई कुठे काय करते' मालिकेचा प्रोमो व्हायरल