Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता वाढत चालली आहे. सध्या या मालिकेत इशाची लगीनघाई सुरू असून लवकरच तिला साखरपुडा होणार आहे. दरम्यान मालिकेत आशुतोषच्या बहिणीची एन्ट्री होणार आहे. 


'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात काय पाहायला मिळणार? 


अरुंधतीने अनिशसाठी आणलेले कपडे आणि अंगठी इशाला आवडलेली नसल्याने ती अंगठी ती लपवणार आहे. तर आजच्या भागात इशा कांचन आजीला अंगठी का घेतली म्हणून जाब विचारताना दिसेल. त्यानंतर कांचन आजी इशाला चांगलच सुनावणार आहेत. त्यानंतर घरातील सर्वांना अंगठी हरवल्याचं कळणार आहे. त्यामुळे घरभर अंगठीची शोधाशोध सुरू होणार आहे. दरम्यान यशला ती अंगठी सापडणार आहे. 


'आई कुठे काय करते' या मालिकेत सध्या इशाच्या साखरपुड्याची जय्यत तयारी सुरू आहे. इशाला शाही पद्धतीने तिचा साखरपुडा करायचा आहे. त्यामुळे तिच्या साखरपुड्याचा खर्च करताना अनिरुद्ध आणि अरुंधतीला नाकीनऊ आलं आहे. अनिरुद्धने अनिशसाठी आणलेली अंगठी इशाला आवडलेली नाही. त्यामुळे ती चिडचिड करत आहे. 






'आई कुठे काय करते' मालिकेत आशुतोषच्या बहिणीची एन्ट्री


'आई कुठे काय करते' या मालिकेत आता आशुतोषच्या बहिणीची एन्ट्री होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिकेत आशुतोषच्या बहिणीची चर्चा रंगली होती. आजच्या भागात 'ती सध्या कुठे असते? असं अनिश आशुतोषला विचारणार आहे. आशुतोषच्या बहिणाला पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक आहेत. 


आशुतोषच्या बहिणीची ग्रॅंड एन्ट्री!


'आई कुठे काय करते' या मालिकेत आशुतोषच्या बहिणीची ग्रॅंड एन्ट्री होणार आहे. इशा ही अनिरुद्धची बिझनेस पार्टनसदेखील आहे. आशुतोषच्या बहिणींचं नाव वीणा असून अभिनेत्री खुशबू तावडे तिच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे आता खुशबू तावडेची 'आई कुठे काय करते' मालिकेत एन्ट्री होणार आहे. वीणाच्या येण्याने 'आई कुठे काय करते' मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. 


संबंधित बातम्या


Aai Kuthe Kay Karte: ईशा आणि अनिशच्या साखरपुड्याची खरेदी; ईशा 35 हजाराचा घागरा घेणार? 'आई कुठे काय करते' मालिकेच्या प्रोमोनं वेधलं लक्ष