Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत सध्या रंजक वळणे येत आहेत. आता या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. अरुंधती परदेशी जाताच आता या मालिकेत यशने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. 


'आई कुठे काय करते' या मालिकेच्या आजच्या भागात अप्पा कोणता तरी विचार करताना दिसत आहेत. यश घरात नसल्याने सर्वच मंडळी चिंतेत आहेत. तेवढ्याच देशमुखांच्या घरी यशच्या अपघाताची बातमी येते. संजना घरातील सर्वांना यशच्या अपघाताची बातमी सांगते. त्यानंतर सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते.


यशचा अपघात झालाय? 


यशला भेटण्यासाठी घरातील सर्व मंडळी रुग्णालयात येतात. त्यावेळी त्यांना कळतं की यश एका टेकडीवरुन खाली पडला आहे. दरम्यान एक व्यक्ती त्याचा जीव वाचवतो आणि त्याला रुग्णालयात घेऊन येतो. यशच्या डोक्याला मार लागलेला असतो. त्यावेळी यशचा जीव वाचवलेला एक व्यक्ती आशुतोषला एक व्हिडीओ दाखवतो. हा व्हिडीओ पाहूण आशुतोषला मोठा धक्का बसतो. या व्हिडीओमध्ये यश टेकडीवरुन स्वत:हून उडी मारताना दिसत आहे. त्यामुळे त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचं आशुतोषला कळतं. 






यश आत्महत्या करताना आणखी दोघांनी पाहिलेलं असतं. पोलीस घटनास्थळी त्यांचा जबाब नोंदवून घेतात. तर दुसरीकडे यशबद्दल संजना काळजी व्यक्त करते. अरुंधती परदेशात गेल्यानंतर यश एकटा पडल्याचं ती म्हणते. तर दुसरीकडे घरातील सर्व मंडळी यापुढे यशला कधी एकटं सोडायचं नाही, असं ठरवतात.


आशुतोष पूर्ण करणार यशचा पालक असल्याचं कर्तव्य


'आई कुठे काय करते' या मालिकेत आशुतोष यशचा पालक असल्याचं कर्तव्य पूर्ण करताना दिसणार आहे. हा विशेष भाग लवकरच पार पडणार आहे. रविवार 28 मे दुपारी 1 आणि रात्री 8 वाजता प्रेक्षकांना स्टार प्रवाहवर हा विशेष भाग पाहायला मिळणार आहे. 


'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधती ही भूमिका मधुराणी प्रभूलकर या साकरतात तर अनिरुद्ध ही भूमिका मिलिंद गवळी  हे साकारतात. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे.


संबंधित बातम्या


Milind Gawali:'आई कुठे काय करते' मालिकेतील मिलिंद गवळींनी लेकीसाठी शेअर केली खास पोस्ट; म्हणाले, 'लेकीबरोबर पुण्यात जाऊन गप्पा...'