Aai Kuthe Kay Kart: मराठी प्रेक्षकांच्या टीव्हीवर ठरलेल्या वेळी येणाऱ्या अरुंधती, अनिरुद्ध, संजना, कांचन आजी, अप्पा आणि आई कुठे काय करते या संपूर्ण मालिकेतील सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली होती. मागील पाच वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारी आई कुठे काय करते ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या मालिकेचा शेवटचा भाग सोमवारी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. दरम्यान पाच वर्ष एखादी भूमिका वठवताना आपल्या पात्राच्या निरोपाची वेळ आल्याचं सांगत या मालिकेतील कलाकारांनी या मालिकेविषयीचा आपला अनुभव शेअर केला आहे. स्टार प्रवाहने त्यांच्या सोशल मीडियावरून या सगळ्याचे  अनुभव पोस्ट केलेत.


अनिरुद्ध असल्याचं कळताच त्या मावशींनी शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या


एखादी नकारात्मक भूमिका साकारणं नायक साकारण्यापेक्षा कठीण काम. आतापर्यंत मालिका चित्रपटात गुणी संस्कारी नायक म्हणून समोर आलो. पण अनिरुद्ध साकारत असताना मी एकदा मार्केटमध्ये गेलो असताना मला एक मावशी भेटल्या. त्या म्हणाल्या तुम्ही तेच ना अरुंधतीच्या सिरियलमधले तिचे मिस्टर. मी हो म्हणताच त्या मावशींनी मला शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या. आता पर्यंत मिळालेल्या भूमिकांमध्ये मला मिळालेला हा सर्वात मोठा पुरस्कार होता. जो आई कुठे काय करते या मालिकेनं मला दिला असं अनिरुद्ध साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी म्हणाले. या मालिकेनं प्रत्येकाला भरभरून दिलं आणि शिकवलं पुरुषानं कसं नसावं असा अनुभव मिलिंद यांनी शेअर केला.


 






संजना म्हणाली, निरोपाची वेळ जवळ आली..


आई कुठे काय करते या मालिकेनं संपूर्ण महाराष्ट्राला न आवडणारं पात्र दिलं ते म्हणजे संजना. पण याच पात्राला महाराष्टानं भरभरून प्रेम दिलं. माझी स्वप्न पूर्ण करण्याचं बळ या मालिकेनं दिलं. आता ही मालिका शेवटच्या टप्प्यात आहे. पण आपली प्रेमाची गाठ कायम बांधली असल्याचं सांगताना संजना पात्र साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले हिचे डोळे पाणावले होते.


 






अरुंधती काय म्हणाली...


स्टार प्रवाहवर पाच वर्षांपासून अरुंधतीची भूमिका साकारणारी मधूराणी प्रभूलकर या अभिनेत्रीला या पात्रामुळं घरोघरी पोहोचवलं. सोशिक, समंजस अरुंधतीला १७ वर्षाच्या तरुणापासून ७० वर्षांच्या वृद्धांपर्यंतचे लोक भेटून मला सांगतात मला तुमच्यात माझी आई दिसते असं सांगतात असं म्हणत अरुंधतीनं आपल्या भावना शेअर केल्या.