दीड महिन्यापूर्वी  बिगबॉसचा नवा सिझन कलर्स टीव्हीवर परतला. या सिझनची पहिल्या एपिसोडपासून चर्चा आहे. बिगबॉसच्या घरातील सदस्यांची लोकप्रीयता दिवसेंदिवस वाढत असताना आता हा शो त्याच्या सातव्या आठवड्यात येऊन पोहोचला आहे. घरातील स्पर्धकांना बिगबॉसच्या घरात एकावर एक टास्क मिळत आहेत. गेम आता हळूहळू अधिक आव्हानात्मक होताना दिसत आहे. दरम्यान, रविवारच्या विकेंड का वारमध्ये एलिमिनेशन न झाल्यानं स्पर्धकांना दिलासा मिळाला आहे. पण आता सोमवारपासून घरात एक नवा टास्क येणार आहे.

बिगबॉस १८मध्ये सध्या घरातील वातावरण सतत बदलताना दिसत आहे. कधी तणावाचं तर कधी खेळीमेळीचं वातावरण पहायला मिळतंय. घरात विवियन, अविनाश, करणवीर, चाहत पांडे, रजत दलाल, शिल्पा शिरोडकर, यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कोणता नवा टास्क येणार?

नुकत्याच झालेल्या विकेंड का वारमध्ये एलिमिनेशन न झाल्यानं घरातील स्पर्धकांनी उसासा सोडला. आता आठवडाभर बिगबॉसच्या घरात या आठवड्याचे नॉमिनेशन टास्क सुरु होणार आहेत. बिगबॉसच्या घरातून समोर आलेल्या एका नव्या प्रोमोवरून आता पुन्हा घरातील वातावरण दोस्ती दुश्मनी मोडवर जाताना दिसतंय. या प्रोमोत शिल्पा शिरोडकर तिचा जवळचा मित्र आणि सह-स्पर्धक करण वीर मेहराला टाइम गॉड टास्क दरम्यान तिला पाठिंबा न दिल्याबद्दल नॉमिनेट करत असल्याचे दिसते. या बदल्यात, करण वीरने शिल्पा बद्दल नेहमीच विवियनची निवड केल्याबद्दल आपली नाराजी स्पष्ट केल्याचं दिसलं.

 

शिल्पा करणवीरमध्ये रजतचे टोमणे

शिल्पानं नॉमिनेट केल्यानं करणवीर शिल्पाच्या दोस्तीवर नाराज झाल्याचं दिसलं. शिल्पा आणि करणच्या प्रकरणात रजत उतरतो आणि त्या दोघांना टोमणे मारतो. यावरून करण आणि रजतमध्ये वादावादी झाल्याचंही दिसतंय..त्यामुळे बिगबॉसच्या घरातील सातव्या आठवड्यात कोण कोणाला नॉमिनेट करतंय हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी दोस्ती दुश्मनी मोडमध्येच स्पर्धक या आठवड्यात खेळणार की काही नवी स्ट्रॅटजी शोधून काढणार याचीही प्रेक्षकांना उत्सुकता आहे.