Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील या मालिकेने बाजी मारली आहे. पण आता या मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे. अरुंधतीच्या आणि आशुतोषमध्ये वाद झालेला पाहायला मिळणार आहे.
'आई कुठे काय करते'च्या आजच्या भागात काय पाहायला मिळणार?
वीणाचं लग्न झाल्याचं सत्य सर्वांसमोर आलं आहे. पण नवरा त्रास देत असल्यामुळे ती पुन्हा आशुतोषकडे आली आहे. आता सत्य समोर आल्याने घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आशुतोष अरुंधतीला म्हणतो की,"वीणाने तिच्या लग्नाचं आणि पतीचं सत्य कोणाला सांगू नको असं सांगितलं असलं तरी ते सर्वांपासून लपवून तू चुकीचं वागली आहेस".
आशुतोषच्या बोलण्यावर अरुंधती त्याला म्हणते की,"वीणाच्या लग्नाची गोष्ट मी मुद्दाम सर्वांपासून लपवलेली नाही. वीणाला भीती वाटत होती की ती सर्वांच्या नजरेतून उतरेल". वीणाच्या या प्रकरणामुळे अरुंधती आणि आशुतोषमध्ये वाद होणार आहे. पण अरुंधती आणि आशुतोषच्या सुखी संसारात झालेला वाद पाहून प्रेक्षक मात्र नाराज झाले आहेत.
आशुतोषचा राग अनावर
आशुतोषला वीणाच्या नवऱ्याला राग आलेला आहे. त्यामुळे तो पोलिसांत तक्रार दाखल करतो आणि सुलेखा ताई, अनिल आणि अरुंधतीला तो यासंदर्भात माहिती देतो. पण आशुतोष मात्र अरुंधतीवर खूप चिडलेला आहे. जेवण करण्यासही तो नकार देतो. तिच्यासोबत बोलण्यासही तो टाळतो. त्यामुळे अरुंधती त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते,"आशुतोष कृपया माझ्यावर रागावू नका. मला खरचं तुमच्यापासून ही गोष्ट लपवायची नव्हती".
अरुंधतीच्या या बोलण्यावर आशुतोष म्हणतो की,"अरुंधती आता इथून पुढे तरी माझ्यापासून काहीही लपवू नका". अरुंधती आणि आशुतोषचं बोलणं अनिश ऐकतो आणि परिस्थिती सांभाळून घेतो. आता अरुंधती आणि आशुतोषचं नातं बहरेल का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. टीआरपीच्या शर्यतीत 'आई कुठे काय करते' ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे.
संबंधित बातम्या