Aai Kuthe Kay Karte Arundhati Madhurani Gokhale Prabhulkar :  कौटुंबिक विषयावरील मालिका छोट्या पडद्यावर सुरू असतात. या मालिकांमध्ये विविध ट्रॅक सुरू असतात. अनेकदा अशा मालिकांमधील मु्ख्य पात्र हे काही एपिसोडस् रडत असते. छोट्या पडद्यावर लोकप्रिय असणाऱ्या 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिकाही सध्या रंजक वळणावर आली आहे. काही दिवसांपूर्वी  अरुंधतीचा पती आशुतोषचे निधन झाले. त्याच्या निधनाने मानसिक धक्क्यात असलेल्या अरुंधती काही दिवस सतत रडत होती. मालिकेतील रडण्याच्या दृष्यामुळे प्रत्यक्षात आजारी पडल्याचे अरुंधती ही व्यक्तीरेखा साकारणाऱ्या मधुराणी प्रभूलकरने (Madhurani Gokhale Prabhulkar) सांगितले. 


अभिनेत्री मधुराणी प्रभूलकरने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर  बारा तास सतत शूट करुन सलग 10-12 दिवस रडण्याचे सीन केल्याचा अरुंधतीला तिच्या खऱ्या आयुष्यातही काय त्रास झाला हे सांगितले. मधुराणीने नुकतीच ‘मिरची मराठी’ला मुलाखत दिली. त्यावेळी आपल्यावर बेतलेला प्रसंग सांगितला. 


मधुराणीने सांगितले की,  “खूप तास काम करण्याचा परिणाम तुमच्या मानसिकेतवर होतो. मला हातच राखून काम करता येत नाही. मी त्या भूमिकेत घुसते. ते चांगलं आहे का वाईट? हे मला माहित नाही. पण मला कधी-कधी असं वाटतं, आपल्याकडे ती ऑन-ऑफ करण्याची कला नाही आहे का? पण तिच माझी खासियत आहे. मी अशी आहे आणि असंच मला करता येतं”. आशुतोषचे मालिकेत निधन झाल्यानंतर मी सलग तीन-चार दिवस बारा तास रडत होते असे मधुराणीने सांगितले. 






मधुराणी प्रभूलकरने पुढे सांगितले की, मी सलग तीन-चार दिवस बारा तास रडत होते. म्हणजे सलग रडण्याचे सीन्स होते. मग माझ्या छातीवर दडपण जाणवायला लागलं. चौथ्या दिवशी मी सकाळी मोबाइलचा अलार्म बंद करायला उठले तेव्हा मला चक्कर आली. दोन-तीन दिवस मी व्हर्टिगोच्या गोळ्या घेऊन काम करत होते. मला माहित नव्हतं याला व्हर्टिगो म्हणतात. झोपलं की, मला गरगरायचं. हे सगळं तणावामुळे होत होतं. व्हर्टिगोच्या गोळ्या घेऊन मी आठवडाभर काम केलं असल्याचे तिने सांगितले. 


कलाकारांनी छोटे-छोटे ब्रेक घ्यावेत...


कलाकारांनी छोटे-छोटे ब्रेक घ्यावेत असे मधुराणीने या मुलाखतीत म्हटले. मालिकेचं काम करताना तुमच्या भावनांचं व्यवस्थापन करायला वेळ मिळत नाही. सतत तुम्ही त्या चक्रात असता. कलाकारांनी छोटे-छोटे ब्रेक घ्यायला हवे, असं मला वाटत असल्याचे मधुराणीने म्हटले.  सगळ्या कलाकारांनी कधीना कधीतरी थेरपी घ्यायला हवी. आपल्या भावनांचं व्यवस्थापन कसं करायचं हे शिकायला हवं. हे मी या चार वर्षांच्या अनुभवातून शिकले असल्याचे तिने सांगितले.