Aai Kuthe Kay Karte : छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेमध्ये अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे अनुरुद्ध ही भूमिका साकारतात. मिलिंद हे सोशल मीडियावर आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. मिलिंद यांनी नुकताच एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला मिलिंद यांनी दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले. 


मिलिंद गवळी यांनी छायाचित्रकार राजू देसाई यांचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सीन अधिकाधिक खुलावा आणि वास्तववादी दिसावा याकरता कलाकारांसोबत दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ मंडळीही झटत असतात. राजू देसाई यांनी एक सीन चक्क टेम्पोवर चढून शूट केला. राजू यांच्या या अनोख्या प्रयत्नाचं मिलिंद गवळी यांनी भरभरून कौतुक केलं आहे.


व्हिडीओला दिलं खास कॅप्शन


राजू देसाई यांचा व्हिडीओ शेअर करुन मिलिंद यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आमचे सिनेमेटोग्राफर राजू देसाई. मी त्यांना दबंग म्हणतो. आम्ही एका सीनचे शूटिंग पार्किंगमध्ये करत होतो. अनेक कलाकार तिथे होते. राजू यांना टॉप शॉट शूट करायचा होता. त्यासाठी ते टेम्पोवर चढले. '


पाहा पोस्ट:






मिलिंद गवळी यांनी पालखी, आधार आणि वैभव लक्ष्मी या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत असतात. आई कुठे काय करते या मालिकेमध्ये संजना ही भूमिका अभिनेत्री रूपाली भोसले ही साकारते तर अरुंधती ही भूमिका मधुराणी प्रभुलकर या साकारतात. या मालिकेनं प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली आहे. या मालिकेचे आत्तापर्यंत जवळपास 725 एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. या मालिकेच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 


हेही वाचा: