Tabu In Main Hoon Naa : बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खान (shah rukh khan) याचा 'मैं हूं ना' (Main Hoon Naa) हा  चित्रपट  2004 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात एक खास गोष्ट म्हणजे अभिनेत्री तब्बू (Tabu) हिनेही या सिनेमात सेकंदभराची भूमिका साकारली होती, पण तिची भूमिका इतकी छोटी होती की अनेक प्रेक्षकांच्या नजरेतून ती सहज सुटली. आता या चित्रपटातील तब्बूच्या (Tabu) या अतिशय छोट्या कॅमिओबाबत एक मजेशीर किस्सा समोर आला आहे. या चित्रपटात तब्बूचा (Tabu) कॅमिओ एक सेकंदापेक्षाही कमी वेळाचा होता. आता पाहूया, ती इतका छोटा रोल का आणि कसा करायला तयार झाली?

फराह खानने सांगितला किस्सा

Diet Sabya या ट्विटर अकाउंटवरून मैं हूं ना चित्रपटातील एक फोटो शेअर करण्यात आला, ज्यामध्ये तब्बू आणि शाहरुख खान दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देण्यात आलं होतं, "आजही मला हे कळत नाही की तब्बू 0.2 सेकंदाच्या भूमिकेसाठी कशी तयार झाली?" यावर मैं हूं ना ची दिग्दर्शिका फराह खान यांनी उत्तर दिलं, "अगं ती दार्जिलिंगला दुसऱ्या शूटसाठी आली होती. ती सेटवर मला भेटायला आली होती, तेव्हा मी तिला त्या सीनमध्ये उभं केलं. ती मेकअपशिवाय होती आणि तिने रोजचे साधारण कपडे घातलेले होते."

'मैं हूं ना'मध्ये शाहरुख खान होते मेजर रामच्या भूमिकेत

या चित्रपटात शाहरुख खानने मेजर राम ही प्रमुख भूमिका साकारली होती. त्याच्यासोबत झायेद खान, सुष्मिता सेन, अमृता राव, किरण खेर आणि नसीरुद्दीन शाह यांसारखे कलाकार होते. मैं हूं ना हा फराह खानचा पहिलाच दिग्दर्शित चित्रपट होता.

'मैं हूं ना' या चित्रपटाची स्टोरी मेजर राम प्रसाद शर्मा (शाहरुख खान) या आर्मी ऑफिसरभोवती फिरते. त्याचे वडील, ब्रिगेडियर शेखावत, मृत्यूपूर्वी त्याला सांगतात की त्याचा एक लहान भाऊ आहे, जो त्याच्यापासून दूर राहतो. आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या भावाशी नातं जुळवण्यासाठी राम कॉलेजमध्ये एक गुप्त मिशन घेऊन प्रवेश घेतो. या मिशनचा उद्देश Project Milaap नावाच्या भारत-पाक मैत्रीच्या योजनेला यशस्वी बनवणे असतो, ज्याला अतिरेकी टाळायचा प्रयत्न करतात.

राम कॉलेजमध्ये जातो आणि तिथे आपल्या भावाला शोधतो. दरम्यान, तो तिथे विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे मन जिंकतो. याच कॉलेजमध्ये त्याची भेट चांदनी मॅडम (सुष्मिता सेन) यांच्याशी होते आणि दोघांमध्ये एक सुंदर लव्हस्टोरी फुलते. रामचा भाऊ लक्ष्मण (झायेद खान) आणि सान्या (अमृता राव) यांची लव्हस्टोरी देखील चित्रपटात रंगत आणते.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Bigg Boss Marathi Fame Suraj Chavan Video: सूरज चव्हाणचं जमलं? साखरपुड्याचा व्हिडीओ व्हायरल; चाहत्यांना दिलाय 'गुलिगत धोका' VIDEO