Swatantrya Veer Savarkar: हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डाचा (Randeep Hudda) लवकरच स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) हा चित्रपट प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला होता. आता या चित्रपटाचा मराठी ट्रेलर देखील लॉन्च करण्यात आलाय. सुबोध भावे (Subodh Bhave) मराठी सावरकरांचा आवाज झाला आहे.  बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hudda) याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून त्याने या चित्रपटात मुख्य भूमिका देखील साकारली आहे. हा सिनेमा 22 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


या चित्रपटाची प्रेक्षकांमध्येही बरीच उत्सुकता होती. आता प्रेक्षकांची ही उत्सुकता संपणार असून स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अंकिता लोखंडेनेही या चित्रपटात वीर सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. अभिनेता सुबोध भावेच्या आवाजात हा चित्रपट मराठी डब करण्यात आलाय.






'स्वातंत्र्यवीर सावरकर' प्रोपगंडा चित्रपट?


आजतकला दिलेल्या मुलाखतीत रणदीप हुड्डाने 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमाबद्दल भाष्य केलं आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' प्रोपगंडा चित्रपट असल्याचं म्हटलं जात आहे. याबद्दल बोलताना रणदीप म्हणाला,"पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) चांगलं काम करत आहेत. मी त्यांचा मोठा चाहता आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा प्रोपगंडा नव्हे तर अँटी प्रोपगंडा सिनेमा आहे. देशातील सर्वात मोठ्या स्वातंत्र्यसैनिकाची गोष्ट तुमच्यासमोर घेऊन येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी या सिनेमावर काम करत आहे".  



'स्वातंत्र्यवीर सावरकर' कधी रिलीज होणार? (Swatantrya Veer Savarkar Release Date)


'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा सिनेमा 22 मार्च 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणदीप हुड्डा या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत असून त्यानेच या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. आधी महेश मांजरेकर या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. पण नंतर काही कारणाने त्यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं नाही. पण आता लवकरच हा सिनेमागृहात येणार आहे.ल 


 



ही बातमी वाचा : 


आशाताईंची लाडकी नात साकारणार सईबाईंची भूमिका, छत्रपतींच्या चित्रपटातून सिनेसृष्टीत करणार पदार्पण, घोषणा होताच मंचावर जनाईने घेतला आजीचा आशिर्वाद