Zanai Bhosale : जेष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosale) यांच्या गाण्यांची भुरळ आणि जादू आजही कायम आहे. फक्त भारतात नव्हे तर जगभरातील संगीतप्रेमींना आशा भोसलेंची गाणी पर्वणीच ठरतात. मंगेशकर घराण्याला लाभलेल्या संगीताचा वारसा हा संपूर्ण मंगेशकर कुटुंबियांनी आयुष्यभरासाठी जपलाय. आता या मंगेशकर कुटुंबाची पुढची पिढी आणि आशा भोसले यांची नात चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. जनाई भोसले (Janai Bhosale) ही लवकच तिचं बॉलीवूडमधील पदार्पण करणार आहे. नुकतच या चित्रपटाची घोषणा झाली.
या चित्रपटाची घोषणा होण्याची जनाईला काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे जेव्हा ही घोषणा झाली तेव्हा तिला मंचावरच अश्रू अनावर झाले. त्यानंतर जनाई पहिल्यांदा तिच्या आजीचा आशिर्वाद घेतला. 'द प्राईड ऑफ भारत-छत्रपती शिवाजी महाराज' या चित्रपटातून जनाई तिचं पदार्पण करणार आहे. तसेच या चित्रपटात ती सईबाईंची भूमिका साकारणार असल्याचं समोर आलं आहे. जनाईसाठी हा अत्यंत सुखद धक्का होता. संदीप सिंह या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे.
जनाईला शब्दच सुचेनात
जेव्हा या चित्रपटाची आणि जनाईच्या भूमिकेची घोषणा जाली तेव्हा तिलाही या गोष्टीची कल्पना नव्हती. त्यामुळे जेव्हा तिला हे कळालं तेव्हा तिला मंचावरच अश्रू अनावर झालेत. यावेळी बोलताना तिनं म्हटलं की, या क्षणाला मला काहीच शब्द सुचत नाहीयेत. त्यामुळे मी आता कीही बोलू शकणार नाही. तसेच यावेळी प्रतिक्रिया देताना आशा भोसले यांनी म्हटलं की, मी नात सुंदरच आहे, पण तिला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीची भूमिका साकारायला मिळणं ही खरचं खूप आनंदाची गोष्ट आहे.
संदीप सिंहने केली जनाईच्या भूमिकेची घोषणा
संदीप सिंहने एका कार्यक्रमादरम्यान त्याच्या 'द प्राईड ऑफ भारत-छत्रपती शिवाजी महाराज' या नव्या चित्रपटाची घोषणा केली. तेव्हा त्यांनी जनाईला मंचावर बोलावलं. त्यानंतर तिच्यासमोर आणि आशाताईंसमोर संदीप सिंहने जनाई त्याच्या आगामी 'द प्राईड ऑफ भारत-छत्रपती शिवाजी महाराज' या चित्रपटात सईबाईंची भूमिका साकारणार आहे.
कोण आहे जनाई भोसले?
जनाई ही आशा भोसले यांचा लेक आनंद भोसले यांची मुलगी आहे. तसेच जनाई सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. उत्तम गायिका असलेली जनाई आता अभिनय करताना रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.