Udaipur Tailor Murder : राजस्थानमधील उदयपूर(Udaipur) शहरात दिवसाढवळ्या दोन लोकांनी कन्हैया लाल या युवकाचा गळा चिरुन हत्या केल्याची घटना घडली. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळं ही हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राजस्थानमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. उदयपूरमधील हत्या प्रकरणामुळे देशभरात खळबळ माजली आहे. बॉलिवूडमधील कलाकारांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया...


स्वरा भास्कर 
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर ही वेगवेगळ्या घटनांवर प्रतिक्रिया मांडते.  उदयपूरमध्ये झालेल्या हत्येवर स्वरानं प्रतिक्रिया दिली आहे. तिनं एक ट्वीट शेअर केलं आहे. त्या ट्वीटमध्ये स्वरानं लिहिलं, 'घृणास्पद आणि निंदनीय, गुन्हेगारांवर कायद्यानुसार तत्परतेने आणि कडक कारवाई झाली पाहिजे. अनेकदा असं म्हटलं जातं... देवाच्या नावाने मारायचे असेल तर सुरुवात स्वतःपासून करा. हे अन्यायकारक आहे.'






विशाल ददलानी
ही घटना मानवतेला धोका निर्माण करणारी आहे, असं म्हणत विशाल ददलानीनं प्रतिक्रिया दिली आहे. विशालनं ट्वीट शेअर केलं. या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं, 'हे सर्व आता हद्दीबाहेर गेले आहे. हे वेडेपणा, भ्रष्ट आणि पूर्णपणे अस्वीकार्य आहे. दोषींवर कायद्याने कारवाई केली पाहिजे आणि त्यांना तात्काळ शिक्षा झाली पाहिजे.'






रिचा चढ्ढा 
रिचा चढ्ढानं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत पोस्टमध्ये लिहिले, 'इशारा न देता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. कृपया हे शेअर करू नका पीडितेच्या कुटुंबाचा आणि त्यांच्या आघाताचा विचार करा! यामुळे त्यांना आयुष्यभर त्रास होऊ शकतो. आरोपींना लवकरात लवकर शिक्षा द्या. '






काय आहे प्रकरण? 


उदयपूर शहरात दोन लोकांनी कन्हैया लाल या युवकाचा गळा चिरुन हत्या केली. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळं ही हत्या करण्यात आली आहे. या संपूर्ण हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. एवढेच नाही, तर आरोपींनी घटनेनंतर सोशल मीडियावर पोस्ट टाकून हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेप्रकरणी भाजपनं आज राजस्थान बंदची हाक दिली आहे. उदयपूरची ही घटना समोर आल्यानंतर राजस्थान सरकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न समोर आला आहे. त्यामुळं आरोपींना अटक केल्यानंतर तातडीनं या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. एसआयटीमध्ये 4 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ADG अशोक राठोड, ATS आयजी प्रफुल्ल कुमार आणि एक SP आणि एका अतिरिक्त एसपीचा या तपासात समावेश करण्यात आला आहे.


हेही वाचा: