Upasana Singh Birthday : अभिनेत्री उपासना सिंह (Upasana Singh) हे मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘बिट्टू शर्मा’च्या आत्याची भूमिका साकारून प्रेक्षकांना गुदगुल्या करणाऱ्या उपासना सिंहने घरोघरी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान बनवले आहे. जवळपास तीस वर्षांपासून ती इंडस्ट्रीत सक्रिय आहे आणि वेगवेगळ्या भूमिका करून तिने आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील न ऐकलेल्या गोष्टींबद्दल....
अभिनेत्री उपासना सिंहचा जन्म पंजाबमधील होशियारपूर येथे झाला. उपासना सिंहने आपल्या करिअरची सुरुवात मुख्य अभिनेत्री म्हणून केली होती. टीव्हीच्या दुनियेसोबतच उपासना पंजाबी चित्रपटविश्वातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. 1986 मध्ये उपासना सिंहने 'बाबुल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. उपासनाने आतापर्यंत 75 चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.
मुख्य अभिनेत्री म्हणून कारकीर्दीस सुरुवात!
उपासनाने 1988मध्ये राजस्थानी चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. हा चित्रपट यशस्वी ठरला आणि त्यामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. अनेक प्रादेशिक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर ती बॉलिवूडकडे वळली. उपासना सिंहने अनेक प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 'डर', 'मैं प्रेम की दिवानी हूं', 'मुझसे शादी करोगी', 'जुदाई' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने आपल्या कामाने चाहत्यांची मने जिंकली.
चित्रपटांतून अभिनय करणे ही उपासना सिंहची करिअरसाठी पहिली पसंती नव्हती. तिला चित्रपटात येण्यापूर्वी डॉक्टर व्हायचे होते. पण, तसे झाले नाही. डॉक्टर बनण्याऐवजी ती टीव्ही आणि मोठ्या पडद्याची यशस्वी अभिनेत्री म्हणून नावारूपास आली.
छोट्या पडद्यावर गाजवलं नाव!
छोट्या पडद्यावरही उपासनाने अनेक कार्यक्रमांतून प्रेक्षकांची भुरळ पाडली आहे. 'राजा की आयेगी बारात', 'बनी-इश्क दा कलमा', 'मायका', 'सोनपरी' यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. मात्र, कपिल शर्माच्या शोमध्ये साकारलेल्या ‘पिंकी बुवा’च्या भूमिकेतून तिला सर्वाधिक ओळख मिळाली. या व्यक्तिरेखेत तिला चाहत्यांनी खूप पसंत केले.
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, उपासना सिंहने 2009मध्ये टीव्ही मालिका 'साथ निभाना साथिया'चा सहकारी अभिनेता नीरज भारद्वाज याच्यासोबत लग्न केले होते. मात्र, हे लग्न फार काळ टिकले नाही आणि दोघेही वेगळे झाले.
हेही वाचा :