ISMA  Requirements 2022 : सरकारी नोकऱ्यांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी. Indian Statics Agriculture and Mapping (ISAM, ISAM) कडून बंपर भरती जारी करण्यात आली आहे. सहाय्यक व्यवस्थापक, फील्ड ऑफिसर, लोअर डिव्हिजन क्लर्क, कनिष्ठ सर्वेक्षण अधिकारी आणि मल्टी टास्क वर्कर यासह विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 5000 हून अधिक पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि ओडिशामध्ये होणार आहे. 


22 जूनपासून या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै 2022 आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार Indian Statics Agriculture and Mapping या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.


भरतीसंदर्भात महत्त्वाची माहिती 



  • सहाय्यक व्यवस्थापक : 1116 पदं

  • फिल्ड ऑफिसर : 542 पदं

  • कनिष्ठ सर्वेक्षण अधिकारी : 1012 पदं

  • निम्न विभाग लिपिक : 1184 पदं

  • मल्टी टास्क वर्कर : 1158 पदं


भरतीसाठी शैक्षणिक योग्यता 



  • सहाय्यक व्यवस्थापक/फिल्ड ऑफिसर : उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणं आवश्यक आहे. कंम्प्युटरबाबत प्राथमिक माहिती असणं आवश्यक. 

  • कनिष्ठ सर्वेक्षण अधिकारी : दहावी पास असणं आवश्यक. त्यासोबतच ड्रॉफ्ट्समन (सिव्हिल) मध्ये दोन वर्षांचं व्होकेशनल ट्रेनिंग सर्टिफिकेट कोर्स किंवा ड्रॉफ्ट्समन ट्रेडमध्ये आयटीआय. 

  • निम्न विभाग लिपिक : बारावी पास असणं आवश्यक. 

  • मल्टी टास्क वर्कर : दहावी पास असणं आवश्यक. 


वेतनश्रेणी 



  • सहाय्यक व्यवस्थापक/फिल्ड ऑफिसर : 45000 रुपये प्रति माह

  • कनिष्ठ सर्वेक्षण अधिकारी : 40000 रुपये प्रति माह

  • निम्न विभाग लिपिक : 35000 रुपये प्रति माह

  • मल्टी टास्क वर्कर : 28000 रुपये प्रति माह


अर्ज शुल्क 


Indian Statics Agriculture and Mapping (ISAM, ISAM) मध्ये नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास, उमेदवारांना 480 रुपयांचं अर्ज शुल्क भरावं लागणार आहे. तुम्ही शक्य असेल त्या पद्धतीनं पैसे पाठवू शकता. म्हणजेच, यूपीआई, नेट बँकिंग, डेबिट, क्रेडिट कार्ड आदि. 


वयोमर्यादा 


भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या सर्व उमेदवारांचं वय कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष असावं. सरकारी नियमांनुसार, आरक्षित वर्गासाठी नियमानुसार, सूट दिली जाईल. 



अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.