Swara Bhaskar, Mahesh Babu :  देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) आणि अभिनेता महेश बाबू  (Mahesh babu) यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. स्वराने आणि महेश बाबूने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना माहिती दिली आहे. 


स्वराची पोस्ट (Swara Bhaskar) 
स्वराने पोस्टमध्ये लिहिले, 'हॅलो कोव्हिड, माझा आरटी-पीसीआर टेस्टचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला आहे. ताप आणि इतर काही लक्षण जाणवल्यानंतर मी कोव्हिड टेस्ट केली. मी दोन लसी घेतल्या आहेत, त्यामुळे अशा आहे की लवकर सगळं ठिक होईल, सर्वांनी सुरक्षित राहा. '






महेश बाबूची पोस्ट (Mahesh babu)
महेश बाबूने इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिले, ' सर्व गोष्टींची काळजी घेऊन देखील माझा कोव्हिड टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला सौम्य लक्षण आहेत. मी स्वत:ला घरीच आयसोलेट केले आहे. मी सर्व नियमांचे पालन करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वत:ची टेस्ट करून घ्यावी. ज्यांनी लस घेतली नाही त्यांनी लवकर लस घ्या. सर्वांनी नियमांचे पालन केले पाहिजे. सर्वजण सुरक्षित राहा.'






बॉलिवूडला कोरोनाचा विळखा
काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूर, रिया कपूर, नोरा फतेही, जॉन अब्राहम आणि मृणाल ठाकुर या कलाकारांना देखील काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. 


हे ही वाचा


Deepika Padukone, Ranveer Singh : रणवीर-दीपिकाचं मुंबईतील आलिशान घर; कोट्यवधींची किंमत अन् बरचं काही


Tanishaa Mukerji Marriage: जोडव्यांच्या फोटोमुळे लग्नाच्या चर्चा; पाहा काय म्हणाली काजोलची बहिण तनीषा..


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह