Tanishaa Mukerji Wedding : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री काजोलची (Kajol) बहिण तनीषा मुखर्जी  (Tanishaa Mukerji) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. तनीषा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करते. काही दिवसांपूर्वी तनीषाने एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तिच्या पायांमधील जोडव्यांनी अनेकांचे लक्ष वेधले. या फोटोमुळे अनेकांना असे वाटले की, तनीषाने गुपचूप लग्न केलं आहे. आता तनीषाने एका मुलाखतीमध्ये तिच्या लग्नाबद्दल माहिती दिली आहे. 

Continues below advertisement


तनीषाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या पायात जोडवे दिसत आहेत. त्यामुळे तिचं लग्न झालं अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. याबद्दल तनीषानं एका मुलाखतीत सांगितल, 'मला पायांमध्ये जोडवी घालायला खूप आवडतात. त्यामुळे मी पायांमध्ये जोडवी घालून एक फोटो काढला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. मला माझ्या फॅशन सेन्सबद्दल स्पष्टीकरण द्यायची गरज वाटत नाही.' 






पुढे तनीषाने सांगितलं, 'लग्न करायची प्रत्येकाचीच ईच्छा असते. मला जो पर्यंत मला आवडेल असा मुलगा मिळणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. '


संबंधित बातम्या


Deepika Padukone : ...म्हणून शूटिंग सेटवर दीपिका घेऊन जाते रंगीत पेन्सिल बॉक्स!


Ankita Lokhande : डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केला अंकिताचा रॉयल लेहेंगा; 1600 तास सुरु होतं काम


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह