Suzhal The Vortex : सध्या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आता चित्रपटांबरोबरच दाक्षिणात्य वेब सीरिज देखील प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. नुकतीच ‘सुजल द वोर्टेक्स’ (Suzhal The Vortex) ही तमिळ सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या सारिजचं बॉलिवूडमधील आणि टॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी कौतुक केलं. या सीरिजमध्ये कथिर, ऐश्वर्या राजेश, श्रिया रेड्डी आणि राधाकृष्णन पार्थिबनलीड या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
‘सुजल द वोर्टेक्स’ ही सीरिज गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अनेक प्रेक्षक या सीरिजची उत्सुकतेने वाट पाहात होते. आता ही सीरिज रिलीज झाल्यानंतर अनेक जण या सीरिजच्या कथानकाचे आणि सीरिजमधील कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. प्रसिद्ध अभिनेता धनुषनं देखील ट्वीट शेअर करुन या सीरिजचं कौतुक केलं आहे. तसेच सामंथा रुथ प्रभुकडून देखील या सीरिजला पसंती मिळाली आहे. तर सीरिजच्या टीमला समंथानं शुभेच्छा दिल्या आहेत. 'सुजल-द वोर्टेक्स' या वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटी विश्वात ऐश्वर्या राजेश पदार्पण करणार आहे.
बॉलिवूड सेलिब्रिटींनी केलं कौतुक
‘सुजल द वोर्टेक्स’ या सीरिजचं विद्या बालन, भूमि पेडनेकर, विक्रांत मेसी, हंसल मेहता आणि अनुराग कश्यप या बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी देखील कौतुक केलं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या कलाकारांनी या सीरिजचं कौतुक केलं आहे. या सीरिजचा ट्रेलर पाहून अनेक जण या सीरिजची उत्सुकतेनं वाट बघत होते.
'सुजल द वोर्टेक्स' या सीरिजमध्ये तमिळनाडूमधील एका मुलीची कथा मांडण्यात आली आहे. या सीरिजचं दिग्दर्शन अनुचरण एम आणि ब्रम्मा यांनी केलं आहे. ही सीरिज 240 देशांमध्ये स्ट्रीम केली जाणार आहे. तामिळ, हिंदी, कन्नड, मल्याळम, तेलुगू, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, इतालवी, जपानी, पोलिश, पोर्तुगी, कॅस्टिलिअन स्पॅनिश, लॅटिन स्पॅनिश, अरबी, तुर्कीसह 30 भाषांमध्ये ही सीरिज प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :
- TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर भारती दबडेने केली आयुष्यातली पहिली कमाई; रंगला ज्ञान आणि मनोरंजनाचा अद्भुत खेळ