मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं मागील वर्षी आत्महत्या केली. हा बॉलिवूडसह सुशांतच्या चाहत्यांना मोठा धक्का होता. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अद्याप तपास सुरु आहे. सुशांत सिंह राजपूतच्या फेसबुकवरचा प्रोफाईल फोटो बदलल्यानं तो पुन्हा चर्चेत आला आहे. यावर चाहते त्याची आठवण काढत असून इमोशनल पोस्ट्स शेअर केल्या जात आहेत.  


Drugs Case : सुशांत सिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठाणीला कोर्टाचा दणका, पुन्हा एकदा जामीन फेटाळला






सुशांत सिंह राजपूतच्या टीमनं त्याचं फेसबुक प्रोफाइल अपडेट केलं होतं. त्यानंतर चाहते अचंबित झाले. सोबतच त्याचा हा फोटो पाहून चाहते भावूकही झाले.  एका चाहत्यानं म्हटलं आहे की, मला वाटलं तू परत आला आहेस. तर दुसऱ्या एका चाहत्यानं म्हटलं आहे की, आज तू जीवंत असायला हवा होता आणि तू स्वत: तुझा डीपी चेंज करायला हवा होता.  


टीम सांभाळत आहे सोशल मीडिया


14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतचं निधन झाल्यानंतर त्याच्या टीमनं वेबसाईटबाबत एक घोषणा केली. हे सोशल मीडिया पेज सुशांतला समर्पित आहे. टीमनं एक पोस्ट शेअर करत म्हटलं होतं की, तो दूर आहे मात्र आमच्यासोबत जीवंत आहे. सुशांतच्या प्रथम स्मृतीदिनाच्या एक दिवस आधी त्यानं संपादन केलेलं यश आणि त्याचा प्रवास अधोरेखित करणारी एक वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. www.ImmortalSushant.com अशी ही वेबसाईट आहे. 




वर्षभरापूर्वी केलेली आत्महत्या.... 
सुशांत सिंह राजपूत यानं वर्षभरापूर्वी मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या निधनानंतर अनेक चर्चांना उधाण आलं. मुंबई पोलिसांशिवाय या आत्महत्येच्या तपासासाठी बिहार पोलीस, सीबीआयही पुढं आली. यानंतर सदर प्रकरणी अनेक धागेदोरे मिळत गेल्यामुळं ईडी आणि एनसीबी या यंत्रणांनीही त्यांच्या परिनं याचा तपास सुरु केला होता. ज्यामध्ये सुशांतची कथित प्रेयसी, अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचीही चौकशी करण्यात आली होती. सुशांतच्या कुटुंबीयांकडून रियावर काही गंभीर आरोप करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. वर्षभरानंतरही या प्रकणारची चर्चा सुरुच आहे. 


SSR Case : मुंबई पोलिसांना सुशांतच्या एडीआर तपासात काहीच संशायस्पद आढळलं नाही, तपास थांबवण्याच्या विचारात यंत्रणा