Sushant Singh Rajput : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) चाहता वर्ग मोठा आहे. सुशांतनं त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. सुशांतच्या निधनानंतर अनेकांनी बॉलिवूडला बायकॉट करण्याची मागणी केली होती. तर काही लोक नेपोटिझमचा देखील विरोध करत होते. आता लोक फ्लिपकार्टला (Flipkart) देखील बायकॉट करण्याची मागणी करत आहेत. पण फ्लिपकार्ट आणि सुशांत सिंहचं कनेक्शन काय आहे? तसेच बायकॉट फ्लिपकार्ट  ट्रेंड का होत आहे? असे प्रश्न अनेकांना पडले असतील जाणून घेऊयात संपूर्ण प्रकरण....


फ्लिपकार्टनं काही टी-शर्टचे फोटो त्यांच्या अॅपवर शेअर केले आहे. या टी-शर्ट्सवर सुशांत सिंह राजपूरचा फोटो आहे. फोटो खाली, 'Depression like drowning'असं लिहिलेलं दिसत आहे. सुशांतबाबत लिहिलेल्या या ओळीमुळे आता नेटकरी फ्लिपकार्ट या कंपनीवर भडकले आहेत. अनेकांनी फ्लिपकार्टला  बायकॉट करण्याची मागणी केली आहे. 


सुशांतच्या चाहत्यांनी शेअर केलं ट्वीट
एका युझरनं एक ट्वीट शेअर केले आहे. या ट्वीटमध्ये युझरनं लिहिलं, 'सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी आजही आम्ही आवाज उठवत आहोत. या घृणास्पद कृत्यासाठी फ्लिपकार्टला लाज वाटली पाहिजे.  या कंपनीमधील लोकांनी सर्वांसमोर येऊन माफी मागितली पाहिजे. अशा घटना पुन्हा घडू नयेत.'






'तुम्ही हा टी-शर्ट सेलमधून काढून टाका हा तुमचा ऑनलाइन स्टोअर विकसित करण्याचा योग्य मार्ग नाही. लोकांच्या भावनांशी खेळू नका.' असं ट्वीट एका नेटकऱ्यानं केलं. 






केदारनाथ, छिछोरे, एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी, दिल बेचारा, पीके,शुद्ध देसी रोमान्स,काय पो चे यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये सुशांतनं प्रमुख भूमिका साकारली. पवित्र रिश्ता या मालिकेमुळे त्याला विशेष लोकप्रियता मिळाली. 


हेही वाचा: