Miraj Pune Railway : मिरज-पुणे रेल्वेमार्गावर दुहेरीकरण कामासाठी राजेवाडी-जेजुरी-दौंड या मार्गावर उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कोयना एक्स्प्रेस तसेच मार्गावर पॅसेंजर गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या कुर्डूवाडी-मिरजमार्गे वळवण्यात आल्या आहेत.
हजरत निजामुद्दीन-यशवंतपूर एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन वास्को गोवा एक्स्प्रेस दौंड- कुर्डूवाडी- मिरजमार्गे धावणार आहेत. बंगळुरू-जोधपूर एक्स्प्रेस, मिरज-कुर्डूवाडी-दौंड-पुणेमार्गे धावेल. या सर्व रेल्वेगाड्या सांगली, कराड, सातारा स्थानकात जाणार नाहीत.
दुहेरीकरणामुळे मुंबई-कोल्हापूर-मुंबई आजची कोयना एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. पुणे- सातारा-पुणे, पुणे-फलटण-पुणे, लोणंद-फलटण-लोणंद पॅसेंजर रविवारपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस सातारपर्यंत धावेल. सातारा ते पुणेदरम्यान ही गाडी रद्द करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
- Dhairyasheel Mane on Naga Panchami : बत्तीस शिराळ्यातील नागपंचमीला परवानगी द्या; खासदार धैर्यशील माने यांची संसदेत मागणी
- Congress vs NCP in Sangli MNC : सांगली महापालिकेत काँग्रेस नगरसेवकांचा राष्ट्रवादीविरोधात नाराजीचा सूर!
- Shivsena : उद्धव ठाकरेंच्या आदेशाने सांगली जिल्ह्यातील शिवसेनेची कार्यकारिणी जाहीर, ग्रामीण जिल्हाप्रमुखपदी अभिजित पाटील यांची निवड