Kanguva Bobby Deol : अभिनेता बॉबी देओलचा (Bobby Deol) आज (दि.27) वाढदिवस आहे. त्याने आपल्या वाढदिनी कंगुवा या सिनेमातील पोस्टर शेअर करत चाहत्यांना गिफ्ट दिले आहे. कंगुवा या सिनेमातही बॉबी देओल (Bobby Deol) नेगेटिव्ह भूमिका करताना दिसणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बॉबीच्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अॅक्शन आणि ड्रामा असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. 


काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील सूर्याचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. पोस्टरला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. रिलीज होताच पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. दरम्यान, आता निर्मात्यांनी सिनेमातील खलनायकाचे पोस्टरही रिलीज केले आहे. या सिनेमात खलनायक म्हणून बॉबॉ देओल (Bobby Deol) भूमिका साकारणार आहे. बॉबी देओलने हे पोस्टर वाढिदिनी शेअर करत चाहत्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. 


सनी देओलने दिल्या बॉबीला शुभेच्छा


अभिनेता सनी देओलने छोट्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत सनीने या शुभेच्छा दिल्या. सनीने बॉबीसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या माध्यमातून सनीने छोट्या भावाप्रति आपले प्रेम व्यक्त केले आहे. पहिल्या फोटोत दोघे भाऊ एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. तर दुसरा फोटो करण जोहरच्या 'कॉफी विद करण-8' या शोमधील आहे. तर तिसऱ्या फोटोत दोघेही धर्मेंद्र यांच्यासोबत दिसत आहेत. या फोटोला सनीने कॅप्शन देखील दिले आहे. "Happy Birthday My Lil #LordBobby" असे कॅप्शन सनीने फोटोला दिले आहे. 


कुंभकर्णाची भूमिका साकारणार बॉबी


रणबीर कपूरच्या अॅनिमल सिनेमात बॉबी (Bobby Deol) खलनायकाच्या भूमिकेत होता. केवळ 15 मिनीटांच्या भूमिकेने बॉबी देओलने (Bobby Deol) प्रेक्षकांची मने जिंकली होती. अॅनिमल या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. संदीप वांगा रेड्डी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. बॉबी नितेशच्या आगामी रामायण या सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉबी रामायण या सिनेमात कुंभकर्णाची भूमिका साकारणार असल्याचे बोलले जात आहे. 






इतर महत्वाच्या बातम्या 


Rajinikanth Lal Salam : ते 'संघी' असते तर 'लाल सलाम' हा सिनेमा केला नसता; रजनीकांतची मुलगी नेटकऱ्यांवर भडकली