Suraj Chavan Upcoming Movie Zapuk Zupuk: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer) आणि आपल्या झापुक झुपूक (Zapuk Zupuk) स्टाईलनं अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारा सूरच चव्हाण (Suraj Chavhan) बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमधून घराघरात पोहोचला. आधी फक्त सोशल मीडियावरच प्रसिद्ध झालेल्या सूरजला अवघा महाराष्ट्र ओळखू लागला. सुरुवातीला अजिबात बिग बॉसचा गेम न समजणाऱ्या सूरज चव्हाणनं शोच्या अखेरपर्यंत मजल तर मारलीच, पण त्यासोबतच ट्रॉफीवर नावंही कोरलं. सूरजला महाराष्ट्रानं भरभरून प्रेम दिलं. अशातच विजेतेपदासोबत दिग्दर्शक केदार शिंदेंनी सूरजला मराठी चित्रपटाची ऑफर दिली. 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या (Bigg Boss Marathi 5) पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यात केदार शिंदेंनी सूरज चव्हाणसोबत 'झापुक झुपूक' (Zapuk Zupuk Movie) चित्रपट करणार असल्याची घोषणा केली. नुकतंच या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं, लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच आता या चित्रपटासंदर्भात अनेक अपडेट्स समोर येत आहेत.
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' चित्रपटासाठी बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाणसोबत स्पर्धक म्हणून झळकलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरच्या नवऱ्यानंही या चित्रपटात मोठं योगदान दिलं आहे. केदार शिंदे (Kedar Shinde) या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत, तर सूरज या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटासाठी अंकिता वालावलकरच्या नवऱ्यानं म्हणजेच, संगीतकार कुणाल भगतनं (Kunal Bhagat) चित्रपटासाठी संगीत दिलं आहे. यासंदर्भात गायक रविंद्र खोमणेनं माहिती दिली आहे.
गायक रविंद्र खोमणेनं पोस्टमध्ये काय म्हटलंय?
गायक रविंद्र खोमणेनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, रविंद्रनं कुणालबरोबरचा फोटो शेअर करत म्हटलं आहे की, "केदार शिंदे (Kedar Shinde) निर्मित 'झापूक झुपूक' (Zapuk Zupuk) या चित्रपटात अभिनेता म्हणून नवा चेहरा 'बिग बॉस' विजेता सूरज चव्हाण दिसणार आहे. या मराठी चित्रपटासाठी एक सुंदर गाणं रेकॉर्ड केलं. याचं संगीत माझे मित्र कुणाल-करण यांनी केलं आहे. यासाठी गाणं करताना खूप मज्जा आली, लवकरच हे गाणं तुमच्या भेटीला येणार आहे."
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणच्या 'झापूक झुपूक' चित्रपटाची अवघा महाराष्ट्र आतुरतेनं वाट पाहत आहे. दरम्यान, 'झापुक झुपूक' चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदेंनी केलं आहे. तर चित्रपटात इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, जुई भागवत, पुष्कराज चिरपूटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे झळकणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे, बेला शिंदे आणि जिओ स्टुडिओजनं केली आहे. येत्या 25 एप्रिलपासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अंकिता वालावलकर आणि सूरज चव्हाण यांच्याबाबत काही गोष्टी समोर आल्या होत्या. स्वतः अंकितानं याबाबत एक व्हिडीओ शेअर करत माहिती दिली होती. तसेच, अंकितासोबत बिग बॉसच्या घरात असलेल्या इतर कलाकारांनीही याबाबत भाष्य केलं होतं. त्याचं झालेलं असं की, अंकिता सूरजला भेटण्यासाठी त्याच्या गावी
सूरज, अंकितामध्ये नेमकं बिनसलेलं काय?
बिगबॉसमधून अवघ्या महाराष्ट्राला आपलसं करुन घेणाऱ्या सूरज चव्हाणच्या वागण्यात बिग बॉसनंतर मात्र बदल झाल्याचं अंकिता वालावलकरनं व्हिडीओ शेअर करुन सांगितलं होतं. बिगबॉस संपल्यावर अंकितानं बारामतीला जाऊन सुरजची भेट घेतली. मात्र तिथे अंकिताला सूरजचा फार वेगळा अनुभव आला, असंही ती म्हणाली होती. आपण तिथे पोहोचल्यानंतर सूरज तासभर आपल्याला भेटायला आलाच नाही, असं तिनं व्हिडीओमध्ये सांगितलं. त्यानंतर तिने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे चर्चांना उधाण आलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :