Suraj Chavan New Home Name Plate Viral: 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) सध्या त्याच्या नव्या घरामुळे (Suraj Chavan New Home) चर्चेत आहे. सूरज चव्हाणनं नव्या घरात प्रवेश केला आणि त्यानंतर धुमधडाक्यात त्याचं लग्न झालं. सूरजनं मामाची मुलगी संजनाशीच संसार थाटलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सूरज चव्हाणनं बिग बॉसची ट्रॉफी उंचावल्यावर त्याला घर बांधून देण्याचा शब्द दिलेला, त्यानुसार अजितदादांनी साध्या पत्र्याच्या घरात राहणाऱ्या सूरज चव्हाणला आलिशान राजमहालासारखं घर बांधून दिलं. लग्नानंतर सूरज आणि संजनानं याच घरात संसार थाटलाय.
अजितदादांनी बारामती तालुक्यात मोढवे गावात सूरज चव्हाणला आलिशान घर बांधून दिलं. बऱ्याच दिवसांपासून सूरज चव्हाणच्या घराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सूरजच्या नव्या घरात मॉड्युलर किचन, हाय सिलिंग आणि आकर्षक लायटिंग करण्यात आली आहे. घरात अद्ययावत सुविधा देण्यात आल्या आहेत. अशातच आता सूरजच्या घराता आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोची सध्या चर्चा रंगलीय. तो फोटो म्हणजे, सूरज चव्हाणच्या घराच्या 'नेमप्लेट'चा. सूरज चव्हाणच्या घराच्या नेमप्लेटनं सर्वांचं लक्ष वेधलंय.
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात सूरज चव्हाण स्पर्धक म्हणून सहभागी झालेला. सूरज चव्हाणनं आपल्या साध्याभोळ्या स्वभावानं सर्वांची मनं जिंकलेली. त्यानंतर अवघ्या महाराष्ट्रानं सूरज चव्हाणला डोक्यावर घेतलं आणि 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता बनवलं. त्यानंतर सूरज चव्हाणचं नशीब पालटलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सूरजला घर बांधून देण्याचं स्वप्न दाखवलं आणि अवघ्या एक वर्षातच पूर्ण केलं. सूरज चव्हाणचं घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी 'बिग बॉस' आणि अजित पवार यांची मोठी भूमिका होती. सूरजनंही यापूर्वी बोलताना याबाबत सांगितलं आहे. पण, सूरजनं आपल्या घराची नेमप्लेट तयार करताना दोघांनाही स्थान न दिल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण, सूरजनं नेमप्लेटवर ठेवलेल्या घराच्या नावामुळे त्याच्यावर आता कौतुकाचा वर्षाव केला जातोय.
सूरज चव्हाणच्या घराच्या 'नेमप्लेट'वर कुणाची नावं?
सूरजनं त्याच्या या स्वप्नातल्या घराला 'आई आप्पांची पुण्याई' असं नाव दिलंय. 'बिग बॉस'मध्येही अनेकदा बोलताना सूरज चव्हाणनं त्याच्या आई-वडिलांबाबत सांगितलेलं. लहानपणीच आई-वडील गमावलेल्या सूरज चव्हाणचं बालपण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत गेलं. त्याचं त्याच्या आई-वडिलांवर जीवापाड प्रेम आहे.
अशातच आता नेमप्लेटच्या माध्यमातून सूरजनं आपल्या आई-वडिलांना खरी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यानंतर त्यानं आता बंगल्याच्या बाहेर आणखी एक नेमप्लट लावली आहे. त्यावर श्री. सूरज चव्हाण आणि सौ. संजना चव्हाण अशी नावं आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :