Girija Oak On Father Girish Oak, Mother Padmashree Phatak Divorce: काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर निळ्या साडीतल्या एका सौंदर्यवतीचे फोटो व्हायरल झाले. जो तो फक्त आणि फक्त तिच्यावरच बोलत होता. साऱ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या. रातोरांत 'ती' नॅशनल क्रश बनली. इंटरनेट सेन्सेशन बनलेली ती, दुसरी तिसरी कुणी नसून मराठमोळी अभिनेत्री (Marathi Actress) गिरीजा ओक (Girija Oak) होती. गिरीजा ओक मराठी मनोरंजन विश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री आणि प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक यांची लेक. गिरीजानं आजवर अनेक मालिका, वेब सीरिज आणि सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
गिरीजा ओक मराठीतले प्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक यांची लेक. गिरिष ओक यांनी गिरीजाची आई पद्मश्री पाठक यांच्यासोबत पहिलं लग्न केलेलं. पण, त्यानंतर दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर गिरीश ओक यांनी दुसरं लग्न केलं. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीत गिरीजा ओकनं आई-वडिलांच्या घटस्फोटाबाबत भाष्य केलं आहे.
मराठी अभिनेत्री गिरीजा ओक काय म्हणाली? (Marathi Actress Girija Oak On Parents Divorce)
नुकत्याच 'हॉटरफ्लायर'ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान गिरिजा ओक म्हणाली की, "माझ्या आईवडिलांमध्ये मतभेद होते. या गोष्टी मला माहीत होत्या. हळूहळू या गोष्टी वाढत गेल्या. त्यानंतर त्यांनी मग वेगळं होण्याचा निर्णय घेतला... आम्ही रोज यातून जात होतो आणि आमचं बाकीचं आयुष्यही जगत होतो, तेव्हा मला काय होतंय हे कळत नव्हतं.... मला पॅनिक अटॅक यायचे. मला प्रचंड घाम यायचा. मला कसंतरीच फिल व्हायचं. आणि हे कुठेही व्हायचं... म्हणजे मी कॉलेजला जाताना किंवा मी लॅबमध्ये असताना, म्हणजे मी करत असलेल्या गोष्टींचं मला टेन्शन नव्हतं. पण, इतक्या वर्षांपासून मी जो तणाव घेतला होता, त्याला माझं शरीर अशा पद्धतीनं प्रतिक्रिया देत होतं. पण, हा तणाव आहे, हेदेखील मला माहीत नव्हतं..."
"मी त्याच दृष्टिकोनातून रिलेशनशिपकडे बघायचे..." : गिरीजा ओक
"एका घटस्फोटित आई-वडिलांची मुलगी असल्याचं ओझं घेऊन मी जगत होते. जेव्हा मी छोटी होते, जेव्हा माझं लग्न झालेलं नव्हतं तेव्हा मी हाच विचार करायचे की, मी माझं लग्न टिकवून दाखवेन. हे प्रेशर मी स्वत:हून घेतलं होतं. पण, मी त्याच दृष्टिकोनातून रिलेशनशिपकडे बघायचे. सुदैवानं मी अशा माणसाशी लग्न केलंय, जो माझा खूप चांगला मित्र आहे. मी त्याच्यासोबत कोणत्याही विषयावर बोलू शकते. आम्ही आता 15 वर्षांपासून एकत्र आहोत, लग्नाला 14 वर्ष झाली आहेत, त्यामुळे आम्हाला सगळं माहीत आहे एकमेकांबद्दल...' असं गिरिजा ओक पुढे बोलताना म्हणाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :