YavatmalNagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025: राज्यभरातीलनगरपरिषद, नगरपंचायतींच्या निकालाचे (Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025) चित्र आता स्पष्ट झालं आहे. राज्यभरात झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतनिवडणुकांमध्येमहायुतीचाच गाजावाजा असल्याचे चित्र आहे. नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणूक या कार्यकर्त्यांच्या निवडणूक असल्याचं म्हटलं जात असलं तरी नगरपालिकांच्या पूर्वी झालेली हि निवडणूक एक प्रकारे सेमीफायनल म्हणूनच बघितल्या गेल्याचं चित्र होतं. त्यासाठी अनेक पक्षातील बड्यानेत्यांनीही प्रत्यक्ष मैदानात उतरून मोर्चेबांधणी केल्याचे बघायला मिळालं तर निकालानंतर अनेक दिग्गज नेत्यांच्या राजकीय प्रतिष्ठेलाही धक्का लागल्याचे बघायला मिळालं. एकंदरीत राज्याच्या राजकारणाची हि सगळी बाजू असताना विदर्भातील यवतमाळमधून एक अतिशय दिलासादायक आणि राजकारण येऊ पाहणाऱ्यासाठीआशादायक अशी बातमी समोर आली आहे.

Yavatmal News : शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री संजय राठोड यांच्या बालेकिल्ल्यात विजय

पाठीशीकुठलंहीमोठं राजकीय पाठबळ नसताना, कुठलाहीपक्षसोबतनसतांनाआणिविशेषम्हणजेआर्थिकबाजूहीसक्षमनसतानाएकातरुण उमेदवारानंलोकशाहीच्यायाउत्सावातआपलंनशीबआजमावलं अन् लोकराजानंत्यांच्यापारड्यातभरभरूनमतदानकरतत्यामेदवारालाविजयहीमिळवूनदिलाय. सचिन उर्फ जांभा कैलास कराळे असं या उमेदवाराचं नाव आहे. यवतमाळच्या नेरमध्ये (Ner) आणि शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री संजय राठोड यांच्या बालेकिल्ल्यात हा विजय संपादन केला आहे.

आर्थिक परिस्थिती बेताची, राहायला हक्काचं घरही नाही, लोक वर्गणीतून निवडणूक अन् विजय

सचिन उर्फ जांभा कैलास कराळे यांच्यापाठीशीकुठलंही राजकीय पाठबळ नसतानाहीजनतेच्याआणिआपल्याकार्याच्याजोरावरनिवडणुकीचाआखाड्यात उतरण्याचानिर्णयघेतला. त्यासाठीत्यांनाजनतेचीहीसाथलाभली अन् लोक वर्गणीतून मिळणाऱ्या पैशातून त्यांनीएकहाती विजय खेचून आणला आहे. विशेषम्हणजे स्वतःची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची, राहायला स्वतःचे हक्काचं घरही नाही. अशा परिस्थितीतही जांभाने आपलीमहत्वकांक्षासोडलीनाही. परिणामी यवतमाळच्या नेर गावाच्या जनतेनेही पारंपरिक समीकरणांना पायदळी तुडवत लोकशाहीची ताकद दाखवून दिली आणि सचिन उर्फ जांभा कैलास कराळे यांच्यावरविश्वासदर्शवतविजयमिळवूनदिला.

Yavatmal Municipal Council Election Result 2025: यवतमाळ नगराध्यक्षपदी भाजपचे ऍड. प्रियदर्शनी उईके विजयी

राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची कन्या ही यवतमाळ नगर परिषदेत भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या होत्या. त्यांनी काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या सून प्रियंका मोघे यांच्यावर दणदणीत विजय मिळविला. हा माझा एकट्याचा विजय नसून संपूर्ण यवतमाळकरांचा विजय असल्याची भावना यावी त्यांनी व्यक्त केली. प्रियदर्शनी विकी यांनी 57 713 मते घेतली तर काँग्रेसची प्रियंका मोघे यांनी 44994 मते पडली यामध्ये प्रियदर्शनी विकी या 12719 मतांनी विजयी झाल्या.

यवतमाळ 

1) नेर नगरपरिषद शिवसेना शिंदे गट सुनीता जयस्वाल नगराध्यक्षपदी 5163 मतांनी विजयी

2).घाटंजी नागरपरिषद नगराध्यक्ष पदी काँग्रेसचे परेश कारिया 4955 मतांनी विजयी

3) दारव्हा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या शिंदे गटाचे सुनील चिरडे विजयी*

4) पांढरकवडा नगरपरिषद भाजपचे आतिष बोरले नगराध्यक्षपदी 213 मतांनी विजयी

5) पुसद नगरपरिषद राष्ट्रवादी कॉग्रेस (अप) ऍड.मोहिनी नाईक विजयी

6) ढानकी नगर पंचायत Shiv UBT - विजयी