Dhurandhar Box Office Collection Day 17: अक्षय खन्ना (Akshaye Khanna), रणवीर सिंहचा (Ranveer Singh) 'धुरंधर' (Dhurandhar Movie) हा चित्रपट सध्या भारतीय बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) चांगलाच गाजतोय. सिनेमा रिलीज होऊन तब्बल तीन आठवडे उलटले आहेत. पण, तरीसुद्धा सिनेमाची क्रेझ काही कमी होताना दिसत नाही. विशेष म्हणजे, सिनेमाच्या कमाईत कोणत्याही प्रकारची घट झालेली नाही, तर तशी चिन्हही दिसत नाहीत. 'धुरंधर'रिलीज झाल्यानंतर तिसऱ्या आठवड्यात सिनेमानं इतिहास रचला आहे आणि विक्रमी कलेक्शन केलंय. रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यात 'धुरंधर'नं किती कमाई केली? 

Continues below advertisement

'धुरंधर'नं रिलीजच्या सतराव्या दिवशी किती कमावले?

या वर्षाच्या सुरुवातीला, विक्की कौशलच्या 'छावा' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिलेली. दरम्यान, अनेक मोठ्या नावांचे चित्रपट आले आणि गेले, पण एकही सिनेमा 'छावा' सारखी धुवांधार कमाई करू शकलेला नाही. अखेर, वर्षाच्या शेवटच्या महिन्यात, प्रतीक्षा संपली आणि आदित्य धरच्या 'धुरंधर' सिनेमानं बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच हा सिनेमा धुवांधार कमाई करतोय. विशेष म्हणजे, चित्रपट सहसा तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी बॉक्स ऑफिसवरुन आपला गाशा गुंडाळू लागतात. पण, 'धुरंधर'च्या बाबतीत याउलट होताना दिसतंय. तर 'धुरंधर'नं तिसऱ्या शनिवारी मोठ्या प्रमाणात नफा कमावला. दुसरीकडे, तिसऱ्या रविवारी या सिनेमानं मोठं वादळ निर्माण केलं, ज्यानं मागील शनिवारी झालेल्या एकूण कमाईपेक्षाही जास्त कमाई केली.

'धुरंधर'च्या कमाईबाबत बोलायचं झालं तर, 'धुरंधर'नं रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 207.25 कोटींचं कलेक्शन केलंय. तर, दुसऱ्या आठवड्यात 253.25 कोटींचा गल्ला जमवला. तर, सिनेमा रिलीज झाल्यानंतर पंधराव्या दिवशी म्हणजेच, शुक्रवारी 22.5 कोटींची कमाई केली. तर, तिसऱ्या शनिवारी फिल्मनं 52.22 टक्क्यांच्या तेजीसह 34.25 कोटींची कमाई केली.  

सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार, 'धुरंधर'नं रिलीजच्या सतराव्या दिवशी म्हणजेच, तिसऱ्या रविवारी 38.50 कोटी कमावले. यासोबतच 'धुरंधर'ची सतरा दिवसांची एकूण कमाई आता 555.75 कोटींच्या पार पोहोचली आहे. 

'धुरंधर' तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट 

'धुरंधर'नं तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी सर्वाधिक कमाई केली आहे. सिनेमानं 'पुष्पा 2' लाही मागे टाकलं आहे. यामुळे तो तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे.

तिसऱ्या आठवड्याच्या शेवटी बॉलिवूड फिल्म्सच्या बॉक्स ऑफिसवरील टॉप 5 कलेक्शन :

सिनेमा  बॉक्स ऑफिस कलेक्शन
धुरंधर 95.25 कोटी
पुष्पा 2 (हिंदी) 60 कोटी
स्त्री 2 48.75 कोटी
गदर 2 36.95 कोटी
जवान  34.81 कोटी

'धुरंधर' 600 कोटींपासून काही पावलं दूर (Dhurandhar Box Office Collection)

'धुरंधर'नं रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यात 95 कोटींपेक्षा जास्त कमाई करून इतिहास रचला. हा चित्रपट आता वेगानं 600 कोटींचा चित्रपट बनण्याच्या दिशेनं वाटचाल करतोय. त्याला फक्त 45 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. चित्रपट ज्या वेगानं कमाई करतोय, एक-दोन दिवसांत हा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. 'छावा'नंतर 600 कोटींचा टप्पा गाठणारा हा या वर्षातील दुसरा चित्रपट ठरेल. हा चित्रपट विक्की कौशलच्या चित्रपटालाही मागे टाकेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Kshitij Patwardhan Post On Marathi Movie Uttar And Dhurandhar: 'धुरंधर'च्या वादळातही 'हा' मराठी सिनेमा ताठ मानेनं उभा; दिग्दर्शक-लेखक क्षितिज पटवर्धन म्हणतोय, 'यापुढे मराठी मार खाणार नाही!'