Sunny Leone Controversy: अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone)च्या नवीन व्हिडीओ अल्बमवरुन चांगलाच वाद पेटला आहे. उत्तर प्रदेशमधील मथुरेत (Mathura) साधुसंतांनी सनी लिओनीच्या नवीन व्हिडीओ अल्बमवर बंदी घालण्याची मागणी केली. साधूसंतांचं म्हणणं आहे की, अभिनेत्री सनी लिओनीनं "मधुबन में राधिका नाचे" (Madhuban Mein Radhika) या गाण्यावर अश्लील डान्स केला आहे. यामुळं धार्मिक भावना दुखावल्या असल्याचं साधूंचं मत आहे. 


सरकार लिओनीविरोधात सरकारनं कारवाई करावी- नवल गिरी महाराज


वृंदावनचे संत नवल गिरी महाराजांनी म्हटलं आहे की,  सरकारनं जर अभिनेत्री सनी लिओनीच्या विरोधात कारवाई केली नाही तर आम्ही कोर्टात जाऊ असं नवलगिरी महाराजांनी म्हटलं आहे. व्हिडीओ अल्बमवर बंदी घालण्याची देखील मागणी त्यांनी केली आहे.   संत नवल गिरी महाराजांनी म्हटलं आहे की, जोवर तो सीन काढून सनी माफी मागत नाही तोवर तिला भारतात राहायला देऊ नये. 


लिओनीनं बृजभूमीची प्रतिष्ठा धुळीस मिळवली-अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभा
  
अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश पाठक यांनी देखील सनी लिओनीच्या डान्स व्हिडीओचा निषेध केला आहे.  लिओनीनं बृजभूमीची प्रतिष्ठा धुळीस मिळवली, असल्याचं अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभेनं म्हटलं आहे. 


सनी लिओनीनं ज्या "मधुबन में राधिका नाचे" गाण्यावर डान्स केला आहे ते गाणं मूळ मोहम्मद रफी यांनी 1960 साली आलेला चित्रपट कोहिनूरसाठी गायलं होतं. सारेगामा म्यूजिकनं बुधवारी मधुबन नावानं एक नवा व्हिडीओ जारी केला आहे. यात सनी लिओनी अत्यंत हॉट दिसत आहे.  


संबंधित बातम्या