Sunil Dutt and Nargis Dutt : दिग्गज अभिनेते सुनील दत्त (Sunil Dutt) आणि अभिनेत्री नर्गिस (Nargis Dutt) यांची प्रेमकहाणी एखाद्या सिनेमातील लव्हस्टोरीपेक्षा कमी नव्हती. जेव्हा दोघं 'मदर इंडिया' (Mother India) या सिनेमाच्या सेटवर पहिल्यांदा भेटले, तेव्हा सुनील दत्त (Sunil Dutt) एक नवखे अभिनेते होते, तर नर्गिस सुपरस्टार होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान लागलेल्या आगीच्या घटनेतून त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली. सर्वांनाच ठाऊक आहे की, जेव्हा सेटवर आग लागली, तेव्हा सुनील दत्त यांनी जीव धोक्यात घालून नर्गिसचा जीव वाचवला होता. सुनील दत्त (Sunil Dutt) आणि नर्गिस (Nargis Dutt) यांनी 1958 साली विवाह केला. मात्र केवळ वयाच्या 52 व्या वर्षी नर्गिस यांचे निधन झाले आणि त्यानंतर सुनील दत्त यांनी कधीच पुन्हा लग्न केलं नाही. यामागे एक खास कारण होतं.


नरगिस (Sunil Dutt and Nargis Dutt) यांचे निधन कर्करोगाशी दीर्घ आणि कठीण झुंज दिल्यानंतर झाले. त्यांच्या मृत्यूनं संपूर्ण कुटुंब हादरलं होतं. इतकंच नव्हे, तर सुनील दत्त पूर्णपणे कोलमडले होते. अनेक वर्षं त्यांनी स्वतःला जगापासून अलिप्त ठेवलं. त्यांची मोठी मुलगी नम्रता दत्त यांनी किश्वर देसाई यांच्या ‘डार्लिंगजी: द ट्रू लव्ह स्टोरी ऑफ नर्गिस अँड सुनील दत्त’ या पुस्तकात सांगितलं, “वर्षानुवर्षं पप्पांनी स्वतःला पूर्णपणे बाजूला केलं होतं. ते त्या खोलीत झोपूच शकत नव्हते. ते नैराश्यात होते, काम करू शकत नव्हते. त्यांना वाटत होतं की ते आईला वाचवतील. पण जेव्हा ते शक्य झालं नाही, तेव्हा ते पूर्णपणे कोसळले. कुणाशी बोलत नव्हते, फक्त ऑफिसला जात, चालायला जात, पण पूर्णपणे शांत राहायचे.”


नर्गिस गेल्यानंतर सुनील दत्त पूर्णपणे खचले होते


सुनील दत्त यांची लहान मुलगी प्रिया दत्त हिने विक्की लालवानी यांना दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं, “आई गेल्यानंतर जवळपास वर्षभर पप्पा पूर्णपणे खचले होते. आम्हाला त्यांच्यासाठी भीती वाटू लागली होती. आम्हाला वाटायचं आता पप्पा काय करतील? ते पहाटे 3-4 वाजता उठायचे, थेट स्मशानभूमीत जायचे आणि तिथं एकटेच बसून राहायचे. त्यांना झोप लागत नव्हती, काम करता येत नव्हतं, काहीही करू शकत नव्हते.”


सुनील दत्त जवळपास दोन वर्षं अशाच नैराश्यात होते, जोपर्यंत त्यांची लहान मुलगी प्रिया हिनं एक निरागस गोष्ट सांगून त्यांना वास्तवाची जाणीव करून दिली नाही. एका रात्री प्रियाने आकाशात एका ताऱ्याकडे बोट दाखवत पप्पांना म्हटलं – “आई आपल्याला त्या पलीकडून बघतेय.” हे ऐकून सुनील दत्त जणू खोल झोपेतून जागे झाले. (Sunil Dutt and Nargis Dutt) 


दारू-सिगारेट सोडून मुलांकडे वळलं लक्ष


त्यानंतर सुनील दत्त स्वतःला सावरलं आणि पुन्हा कामाला सुरुवात केली. याच संभाषणात प्रियाने सांगितलं, “पप्पांना जणू वास्तवाची जाणीव झाली. त्यांनी लगेच घरातली सगळी सिगारेट फेकून दिली. दारूच्या बाटल्या बाहेर फेकून दिल्या. ते आधी दारू पित होते, पण एका रात्रीत सगळं सोडलं. त्यानंतर त्यांनी पूर्ण लक्ष मुलांकडे दिलं.” (Sunil Dutt and Nargis Dutt) 


तीन मुलांची जबाबदारी एकट्यानं उचलली


यानंतर सुनील दत्त यांनी आपल्या आयुष्यात सावरण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र बाहेरच्या जगाला वाटायचं की त्यांनी लवकरच दुसरं लग्न केलं पाहिजे. त्या वेळी ते 52 वर्षांचे होते. एकटं राहून तीन मुलांची जबाबदारी ते उचलत होते. संजय दत्त त्या काळात व्यसनांच्या गर्तेत होता, नम्रता लवकर घराची जबाबदारी सांभाळत होती, आणि प्रिया अजून किशोरावस्थेत होती. (Sunil Dutt and Nargis Dutt) 


नर्गिसने स्वप्नात दिला होती सुनील दत्त यांना इशारा 


नर्गिस यांची भाची जाहिदा हुसैन हिने एकदा सांगितलं होतं की, नर्गिस गेल्यानंतर खूप दिवसांनी ती सुनील यांच्या स्वप्नात आली होती आणि म्हणाली होती – “सुनीलला सांग, तो दुसरं लग्न करू नये. जर केलं, तर मी त्याला कधीच सुखात जगू देणार नाही.” जेव्हा जाहिदा हिने ही गोष्ट सुनील दत्त यांना सांगितली, तेव्हा त्यांनी आश्चर्याने विचारलं – “ती तुझ्या स्वप्नात आली, माझ्या नाही? पण मी दुसरं लग्न कसं करू? माझ्या आयुष्यात दुसरी मिसेस दत्त असूच शकत नाही. तिला सांग, काळजी करू नकोस. मी कधीच दुसरं लग्न करणार नाही.” (Sunil Dutt and Nargis Dutt) 


सुनील दत्त यांनी केलं नाही दुसरं लग्न


जाहिदा सांगते की, “मी सांगितल्यावर त्यांनी हसत उत्तर दिलं. पण त्यांचं मन ठाम होतं – त्यांच्या आयुष्यात नर्गिसची कोणीच घेऊ शकणार नाही.” आणि खरंच, सुनील दत्त (Sunil Dutt and Nargis Dutt) यांनी कधीच दुसरं लग्न केलं नाही. त्यांनी एकट्यानं आपली तीन मुलं वाढवली. 75 वर्षांचे असताना त्यांचं निधन झालं.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Jeetendra Became Owner Of RS 855 Crores: जितेंद्र यांनी 83 व्या वर्षी कमावले 855 कोटी! एका रात्रीत नशीब पालटलं, नेमकं काय केलं?